कुडाळ गटात भाजपच्या सौ जयश्रीताई गिरीचां प्रचाराचा झंझावात साताऱ्याच्या अस्मितेला सुरेल सलाम’आम्ही सातारी’ गीताचा मंगळवारी शाहू कलामंदिरात भव्य प्रकाशन सोहळा कोडोलीच्या सुपुत्राचा राष्ट्रीय स्तरावर गौरव; उस्मानाबादी शेळी संवर्धनासाठी ‘NBAGR’ कडून विशेष सन्मान  कुंभरोशी गणात ‘कमळ’ फुलणार? सामाजिक कार्याचा वारसा अन् दांडगा अनुभव असलेले सुरेश जाधव रिंगणात! गौरीशंकर सुखात्मे स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न विद्यार्थ्यांच्या कलाविष्काराचे रसिक प्रेक्षकांकडून झाले कौतुक  लढायचं परिवर्तनासाठी, लढायचं विकासासाठी! – श्री. सुभाष महादेव सोंडकर यांना भाजपची अधिकृत उमेदवारी
Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » उद्योगजगत » महाराष्ट्रातील ठेकेदारांचे बिल अदा करण्यासाठी साताऱ्यात श्री रमेश उबाळे यांचे उपोषण

महाराष्ट्रातील ठेकेदारांचे बिल अदा करण्यासाठी साताऱ्यात श्री रमेश उबाळे यांचे उपोषण 

महाराष्ट्रातील ठेकेदारांचे बिल अदा करण्यासाठी साताऱ्यात श्री रमेश उबाळे यांचे उपोषण 

सातारा दि: महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये उलटा पालथ करण्यासाठी विकास दाखवला जातो. हा विकास करणाऱ्या महाराष्ट्र राज्यातील बारा हजार छोट्या मोठ्या ठेकेदारांचे सुमारे ४९ हजार कोटी रुपये बिल थकवले गेले आहे. त्याचा पहिला बळी ठेकेदार हर्षद पाटील यांचा झाला. उर्वरित ठेकेदारांचा जीव वाचवण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते श्री रमेश अनिल उबाळे सोमवार दिनांक ४ ऑगस्ट पासून सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर प्राणांतिक उपोषण सुरू करणार आहेत. या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी सातारा जिल्ह्याचे राज्यभर ठेकेदार प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. 

     महायुती असो किंवा महाविकास आघाडी अथवा त्यांचे समर्थन करणाऱ्या राजकीय पक्षाच्या सर्वच कार्यक्रमासाठी ठेकेदारांचे योगदान खूप मोठे आहे. विशेषतः ग्रामीण भागामध्ये दळणवळणाची साधने उपलब्ध करून देण्यासाठी काही ठेकेदार स्वतःच्या घरावर तुळशी पत्र ठेवतात. स्टॅंडर्ड ऑफ लिविंग जपण्यासाठी देखावा करतात. परंतु आर्थिक अडचणीनंतर सरकारने माणुसकी भावनेतून त्यांना बघण्याऐवजी त्यांचा ठेकेदार हर्षल पाटील होणे पर्यंत वाट पाहतात. याचा पहिला निषेध व्यक्त केला जात आहे. 

    एखाद्या कामाची एकदा नव्हे तर चार वेळा तपासणी करून सुद्धा त्या कामाचे बिल अदा करणे. हे नैतिकदृष्ट्या कर्तव्य असूनही हे कर्तव्य पार पाडले गेले नाही. त्यामुळे ठेकेदारांवर शेतकऱ्यांच्या आत्महत्या इतकीच वेळ आलेली आहे. केलेल्या कामाची गुणवत्ता राखल्यामुळे अनेक ठेकेदारांना निविदामध्ये नमूद केल्यापेक्षाही जास्त रक्कम त्या कामात खर्ची करावी लागलेली आहे. 

     विकास कामांसाठी जे मंजूर काम करतात. त्यांना आठवड्यातून एकदा मजुरांना पगार द्यावाच लागतो. यासाठी ठेकेदार आपल्या घरातील दागिने किंवा आपली संपत्ती तारण ठेवून पैसे गोळा करतात. आता काही ठेकेदारांची आर्थिक कॅपॅसिटी संपली आहे. हात उसने घेतलेल्या देणीकार्‍यांचे आता त्यांच्यामागे तगादा लागला गेला आहे. ही वस्तूची अधिकारी वर्गाला चांगलीच माहित आहे.    

            राज्य शासनाने लाडक्या बहिण योजना झटकेपट राबवून सत्ता हस्तगत केली. आता लाडका ठेकेदार इतर ठिकाणी रखवालदार म्हणून काम करण्यास पात्र ठरवलं आहे का? अशी आता गरीब ठेकेदार विचारणा करू लागलेली आहेत. राज्य शासनाने संबंधित ठेकेदारांचे किमान पूर्ण काम झालेले बिल अदा करावे. अशी मागणी श्री रमेश अनिल उबाळे यांनी केली आहे. 

कुठल्याही जाती पंत धर्मासाठी ठेकेदार काम करत नसून सर्व समाज आपला आहे अशा भावनेतून कामे करत असतो. ज्या राज्याच्या ठेकेदारांचे बिल थकले आहे त्या राज्याचा विकास ती दाखवण्याचा प्रयत्न केला तरी तो पालथ्या घड्यावर पाणी असल्याचे मत जुने जाणते ठेकेदार व्यक्त करत आहेत. वाढत्या बेरोजगारीमुळे सुशिक्षित बेरोजगार आता उधारीवर काम करण्यास तयार नाहीत. त्याचा महाराष्ट्राच्या जनतेवर परिणाम होत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

  संबंधित ठेकेदार हा वैद्यकीय बिल मागत नाही. तर केलेल्या कामाचे श्रमाचे पैसे मागत आहे. त्याचा अवमान करू नये. अन्यथा महाराष्ट्र राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये त्याची किंमत मोजावी लागेल. असे श्री रमेश अनिल उबाळे यांनी भाकीत केले आहे.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

कुडाळ गटात भाजपच्या सौ जयश्रीताई गिरीचां प्रचाराचा झंझावात

कुडाळ गटात भाजपच्या सौ. जयश्रीताई गिरीचां प्रचाराचा झंझावात मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचा विश्वास सार्थ ठरवत विजयश्री खेचून आणणार सातारा:जावली तालुक्यात

Live Cricket