Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » मोबाईलचा अतिवापर शालेय विद्यार्थ्यांसाठी घातक-श्रीरंग काटेकर

मोबाईलचा अतिवापर शालेय विद्यार्थ्यांसाठी घातक-श्रीरंग काटेकर

मोबाईलचा अतिवापर शालेय विद्यार्थ्यांसाठी घातक-श्रीरंग काटेकर

गौरीशंकर च्या डॉ पी. व्ही. सुखात्मे स्कूल येथे विद्यार्थी पालक शिक्षकांचे चर्चासत्र संपन्न.

विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेबाबत प्रबोधन. अनोख्या उपक्रमाचे पालक वर्गाकडून स्वागत.

लिंब- विज्ञान तंत्रज्ञानाच्या युगात जन्मलेले नव्या पिढीने आधुनिकतेच्या आधारे ते आपल्या जीवनाची वाटचाल करीत आहे. मोबाईल व सोशल मीडिया च्या माध्यमातून आज संपूर्ण जग घराघरात पोहोचले आहे. या माध्यमातून नवी पिढी आधुनिक तंत्रज्ञानाने समृद्ध होत आहे. शैक्षणिक प्रगतीला ते पूरक ही ठरत आहे. हे जरी सत्य असले तरी मोबाईल व सोशल मीडियाचा शालेय विद्यार्थ्यांकडून होणारा अतिवापरामुळे या विद्यार्थ्यांचे बालपणाचे जगणेच हरवून गेले आहे. ना शारीरिक तंदुरुस्ती ना मानसिक निरोगी आरोग्य याकडे कळत नकळत दुर्लक्ष झाल्याने या नव्या पिढीमध्ये स्मरणशक्तीचा अभाव तसेच चॅट जी पी टी च्या आधारे माहिती संकलन करणारे ही नवी पिढी स्वतःचा आत्मविश्वासच गमावून बसले आहे. मोबाईल व सोशल मीडियाच्या शालेय विद्यार्थ्यांना विळखा त्यांच्या विनाशाला खऱ्या अर्थाने कारणीभूत ठरत आहे. याची प्रचिती समाजात घडणाऱ्या विविध घटनेतून दिसून येत आहे. सामाजिक वातावरण दूषित होणाऱ्या ज्या घटनांमध्ये विशेषता मुलींच्या छेडछाडी विनयभंग अत्याचार यासारख्या घटना किशोरवयीन विद्यार्थ्यांकडून घडू लागले आहेत. यामधून शालेय स्तरावरील मुलींच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न आता समाजापुढे उभा राहिला आहे. दूषित होणाऱ्या सामाजिक वातावरणामुळे सर्वच पालक वर्ग आता चिंतेत आहे. मुलींची सुरक्षितता हा सामाजिक ज्वलंत प्रश्न उभा राहिला आहे. मुलींच्यावर अन्याय अत्याचाराच्या घडणाऱ्या घटनेत दिवसेंदिवस वाढ होत असून यामधून मुलींची सुरक्षितता बाबत घ्यावयाची दक्षता संदर्भात गौरीशंकर च्या डॉ पी व्ही सुखात्मे इंग्लिश मीडियम स्कूल येथे जनजागृती व विद्यार्थी पालक शिक्षक यांची या विषयावर चर्चासत्र चे आयोजन केले होते .

31 जुलै २०२५ रोजी झालेल्या या चर्चासत्रात शंभरहून अधिक पालक वर्गाने यामध्ये सहभाग घेतला होता. विद्यार्थी पालक शिक्षक यांचा एकत्रित चर्चासत्राच्या आयोजनामुळे विद्यार्थ्यांच्या समस्या व त्यावर उपाय याबाबत सखोल पणे मंथन करता आले. पालकाने पाल्याच्या गुणवत्तेबरोबरच त्यांच्या सुरक्षिततेचाही प्रश्न तितकाच महत्त्वाचा आहे याची जाणीव या निमित्ताने सर्व पालकांना झाली. गौरीशंकर च्या डॉ पी व्ही सुखात्मे स्कूलने केलेल्या या उपक्रमाचे सर्व पालकांनी कौतुक केले मुलींच्या सुरक्षिततेबाबत जागृत असणाऱ्या स्कूलने यानिमित्ताने विद्यार्थी पालक शिक्षक यांना व्यासपीठ उपलब्ध करून दिले. संस्थेचे अध्यक्ष मदनराव जगताप प्रशासकीय अधिकारी नितीन मुडलगीकर यांच्या सूचनेवरून विद्यार्थी पालक शिक्षक यांचे एकत्रित चर्चासत्र आयोजन केले होते.

यावेळी पालकांकडून प्राप्त सूचनेचे पालन सर्वच घटकाने करण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला. यावेळी विद्यार्थिनी संस्कृती कदम हिने मनोगत व्यक्त केले. तर मुलींची सुरक्षितता याविषयी शिक्षिका शैला शिंदे व स्नेहल कांबळे यांनी माहिती विशद केली. नितीन शिवतरे यांनी आभार मानले. श्रीरंग काटेकर जनसंपर्क अधिकारी गौरीशंकर नॉलेज सिटी लिंब सातारा. 

 

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

सातारा जिल्हा बॉक्सिंग स्पर्धेत श्रीपतराव पाटील हायस्कूलला सुवर्ण झळाळी

Post Views: 20 सातारा जिल्हा बॉक्सिंग स्पर्धेत श्रीपतराव पाटील हायस्कूलला सुवर्ण झळाळी सातारा:करंजे पेठ येथील शिक्षण प्रसारक संस्था संचलित श्रीपतराव

Live Cricket