Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » श्री क्षेत्र महाबळेश्वर येथे पहिल्या श्रावणी सोमवार निमित्त भाविकांची अलोट गर्दी

श्री क्षेत्र महाबळेश्वर येथे पहिल्या श्रावणी सोमवार निमित्त भाविकांची अलोट गर्दी 

श्री क्षेत्र महाबळेश्वर येथे पहिल्या श्रावणी सोमवार निमित्त भाविकांची अलोट गर्दी 

महाबळेश्वर – दक्षिण काशी म्हणून ओळख असलेल्या श्री क्षेत्र महाबळेश्वर येथे पहिल्या श्रावणी सोमवार निमित्त श्री महाबळेश्वराच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती संपूर्ण मंदिर परिसर शिवशंभोच्या नामघोषाने दुमदुमून गेला होता.

      पहिल्या श्रावनी सोमवार या विशेष दिवशी श्री महाबळेश्वराचे मंदिर विविध फुलांच्या माळांनी आकर्षकपणे सजवण्यात आले होते. पहाटे पासूनच भाविकांनी दर्शनासाठी रांगा लावल्या होत्या श्री क्षेत्र महाबळेश्वर देवस्थान ट्रस्ट आणि ग्रामस्थांनी भाविकांना कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी चोख नियोजन केले होते भाविकांनीही शिस्तबद्ध पद्धतीने रांगेत उभे राहून दर्शनाचा लाभ घेतला.

            यावेळी अनेक भाविकांनी शिवपंचगंगा मंदिरात गायमुखातून पडणाऱ्या पंचगंगेच्या पवित्र पाण्यात स्नान करण्याचा आनंद घेतला. देवस्थान ट्रस्ट आणि ग्रामस्थांच्या वतीने भाविकांसाठी दूध आणि उपवासाच्या खिचडीचे वाटप करण्यात आले होते ज्यामुळे भाविकांना दिलासा मिळाला.श्रावणातील पहिल्याच सोमवारी भाविकांनी दाखवलेली श्रद्धा आणि उत्साह संपूर्ण परिसरात भक्तीमय मंगलमय वातावरण निर्माण झाले होते.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

Live Cricket