कुडाळ गटात भाजपच्या सौ जयश्रीताई गिरीचां प्रचाराचा झंझावात साताऱ्याच्या अस्मितेला सुरेल सलाम’आम्ही सातारी’ गीताचा मंगळवारी शाहू कलामंदिरात भव्य प्रकाशन सोहळा कोडोलीच्या सुपुत्राचा राष्ट्रीय स्तरावर गौरव; उस्मानाबादी शेळी संवर्धनासाठी ‘NBAGR’ कडून विशेष सन्मान  कुंभरोशी गणात ‘कमळ’ फुलणार? सामाजिक कार्याचा वारसा अन् दांडगा अनुभव असलेले सुरेश जाधव रिंगणात! गौरीशंकर सुखात्मे स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न विद्यार्थ्यांच्या कलाविष्काराचे रसिक प्रेक्षकांकडून झाले कौतुक  लढायचं परिवर्तनासाठी, लढायचं विकासासाठी! – श्री. सुभाष महादेव सोंडकर यांना भाजपची अधिकृत उमेदवारी
Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » वाईच्या वनविभागाच्या गलथान कारभारामुळे बिबट्याचा वासोळ्यात धुमाकूळ – बाजीराव नवघणे

वाईच्या वनविभागाच्या गलथान कारभारामुळे बिबट्याचा वासोळ्यात धुमाकूळ – बाजीराव नवघणे 

वाईच्या वनविभागाच्या गलथान कारभारामुळे बिबट्याचा वासोळ्यात धुमाकूळ . बाजीराव नवघणे 

वाई प्रतिनिधी (शुभम कोदे)वाई तालुक्याच्या पश्चिम भागातील वासोळे  गावात रविवारच्या मध्य रात्रीच्या वेळी अंदाजे दिड वाजण्याच्या सुमारास  गावचे सामाजिक कार्यकर्ते आणी उद्योजक बाजीराव नवघणे यांच्या दारात बिबट्या पोहचला आणी तेथे असणाऱ्या पाळीव कुत्र्यावर झडप घातली अन् कुत्रा जोरात ओरडला त्यावेळी बाजीरावांनी आरडा ओरडा केल्याने बिबट्याने पळ काढला .पण या हल्यात कुत्रा गंभीर जखमी झाला आहे . या घटने मुळे नागरिकांन मध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे .

वाई तालुक्याच्या वनविभागाच्या गलथान कारभारा मुळे धोम धरणाचे पश्चिम भागातील शेवटचे गाव म्हणजे वासोळे गाव आहे .या गावाच्या उशालाच सह्याद्रीच्या पर्वत रांगांच्या डोंगर दऱ्या आहेत त्यात घनदाट जंगल असल्यामुळे .या घनदाट जंगलात गेल्या कित्येक वर्षांपासून रानडुकरांचे  मोठ मोठे कळपांनसह   बिबट्याचा रहावास आहे. त्याने आज पर्यंत गाई म्हैशी शेळ्या कुत्री यांचा पडश्या पाडला आहे पाडले त्याच्या ऩोंदी वनविभागाच्या दप्तरी आढळून येतात .

त्यामुळे येथील शेतकऱ्याचे पशुधन देखील धोक्यात आले  आहे . त्याच बरोबर येथील शेतकऱ्यांच्या जिवीतास धोका निर्माण झाला आहे ‌.असा आरोप येथील सामाजिक कार्यकर्ते बाजीराव नवघणे यांनी केला आहे .ते माहिती देताना पुढे म्हणाले कि या बाबतच्या तक्रारी अनेकदा माझ्यासह येथील शेतकऱ्यांनी वनविभागाकडे करून रानडुकरानसह बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी करुन देखील वनविभागाचे अधिकारी आणि कर्मचारी या गंभीर प्रश्नाकडे जाणीव पुर्वक दुर्लक्ष करून माणसांचे मुडदे बिबट्याने पाडावेत व तदनंतरच वनविभाग उपाय योजना करणार का ? असा संतप्त सवाल बाजीराव नवघणे यांनी केला आहे .

वाईच्या वनविभागाच्या अधिकाऱ्यांनसह या गावांसाठी आणी परिसरासाठी नेमलेले कर्मचारी नेमके काय काम करतात याची चौकशी सातारा येथील वरिष्ठ अधिकारी वर्गाने तातडीने करुन बेजबाबदार अधिकारी आणी कर्मचाऱ्यांना निलंबित करावे अशीही मागणी बाजीराव नवघणे यांनी दिलेल्या निवेदनात केली आहे .

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

कुडाळ गटात भाजपच्या सौ जयश्रीताई गिरीचां प्रचाराचा झंझावात

कुडाळ गटात भाजपच्या सौ. जयश्रीताई गिरीचां प्रचाराचा झंझावात मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचा विश्वास सार्थ ठरवत विजयश्री खेचून आणणार सातारा:जावली तालुक्यात

Live Cricket