यशोदा इन्स्टिट्यूट मध्ये अविष्कार संशोधन स्पर्धा पूर्व एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन
शिवाजी विद्यापीठाचा विद्यार्थी विकास विभाग तज्ञ मार्गदर्शका मार्फत करणार मार्गदर्शन
सातारा येथील यशोदा शिक्षण प्रसारक मंडळाचे यशोदा टेक्निकल कॅम्पस आणि शिवाजी विद्यापीठाचा विद्यार्थी विकास विभाग यांच्यातर्फे बुधवार दिनांक 23 जुलै रोजी एक दिवसीय जिल्हास्तरीय अविष्कार संशोधन स्पर्धा पूर्व माहिती कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. ही कार्यशाळा सकाळी 9 ते सायंकाळी 5 या वेळेत महाविद्यालयातील ‘मॅनेजमेंट बिल्डिंग’ मध्ये संपन्न होत आहे. शिवाजी विद्यापीठ विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. टी एम चौगुले, अविष्कार संशोधन स्पर्धेचे समन्वयक डॉ. पी के पवार, सांगली जिल्हा समन्वयक डॉ. एस डी जाधव हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार असून यशोदा इन्स्टिट्यूट चे संस्थापक प्रा. दशरथ सगरेअध्यक्ष स्थानी असणार आहेत. विद्यार्थी विकास विभागाचे जिल्हा समन्वयक डॉ. देवानंद सोनटक्के यांचे देखील प्रमुख उपस्थिती असणार आहे.
जिल्ह्यातील सुमारे 38 महाविद्यालयातील 250 हुन अधिक विद्यार्थी आणि प्राध्यापक प्रतिनिधी या कार्यशाळेत सहभागी होणार आहेत. नियोजित कार्यशाळेमध्ये अविष्कार संशोधन स्पर्धा संदर्भात मार्गदर्शन तसेच अविष्कार संशोधन स्पर्धेच्या यशस्वी आणि प्रभावी आयोजनासाठी आवश्यक असणारी माहिती, नियोजन, मूल्यांकन आणि प्रस्तुतीकरण या संदर्भात देखील सखोल मार्गदर्शन या कार्यशाळेमध्ये होणार आहे.पदवी स्तरावर अविष्कार संशोधन स्पर्धेमध्ये विविध विषयातील तज्ञ मार्गदर्शकांमार्फत विद्यार्थी आणि प्राध्यापकांना दिवसभर विविध क्षेत्रांमध्ये मार्गदर्शन केले जाणार आहे.
संशोधन ही आताच्या काळाची सर्वात मोठी गरज बनले आहे बदलत्या शिक्षण पद्धतीनुसार संशोधनाचे महत्त्व देखील विद्यार्थी स्तरावर मोठ्या प्रमाणावर अधोरेखित केले गेले आहे. अविष्कार संशोधन स्पर्धेच्या निमित्ताने सहभागी होणाऱ्या महाविद्यालयातील शिक्षक विद्यार्थ्यांना योग्य दिशा मिळावी आणि सर्व विषयांची सखोल माहिती मिळावी असा या कार्यशाळा आयोजनाचा मुख्य उद्देश आहे. या जिल्हास्तरीय अविष्कार संशोधन स्पर्धा पूर्व कार्यशाळेसाठी जिल्ह्यातील सर्व पदवी महाविद्यालयाने सहभागी व्हावे असे आवाहन यशोदा टेक्निकल कॅम्पस चे व्यवस्थापन शास्त्र प्रमुख प्रा. रणधीरसिंह मोहिते, तसेच या कार्यशाळेचे समन्वय डॉ.राजश्री चव्हाण यांनी केले आहे.





