अंगणवाडीच्या चिमुकल्यांनी केले वृक्षारोपण
(समाजातील युवकांना एक आदर्श घेणारा उपक्रम )
शिवथर. धुमाळवाडी (नांदगिरी ) तालुका कोरेगाव येथील अंगणवाडी क्रमांक 109 येथील चिमुकल्यांनी वृक्षारोपण करून गावांमध्ये नव्हे तर जिल्ह्यामध्ये एक आदर्श घेणार उपक्रम केला. महाराष्ट्र शासनाने सर्वच थरातील राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्रामध्ये वृक्ष लागवडीसाठी उपक्रम राबवला होता. त्याच अनुषंगाने सर्वांना दिशा देणारा उपक्रम राबवला आहे.
धुमाळवाडी तालुका कोरेगाव येथील अंगणवाडी क्रमांक 109 शासनाने ठरवून दिलेले उपक्रम नेहमीच राबवत असते. त्याच पद्धतीने अंगणवाडीच्या लहान मुलांच्या हस्ते तसेच पालकांच्या उपस्थितीत अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांनी वृक्षारोपण केले.
राज्यामध्ये रस्ता रुंदीकरण चालू असल्याने विविध ठिकाणी मोठ्या प्रमाणात वृक्ष तोडण्याचे काम होत आहे त्याच पटीमध्ये वृक्षांची लागवड देखील होत आहे सध्या पर्यावरणाचा ऱ्हास होऊ नये त्यासाठी सर्वांनीच जास्तीत जास्त वृक्ष लागवड केली पाहिजे भविष्यामध्ये वृक्ष लागवड ही शासकीय अथवा खाजगी जागेमध्ये होणे गरजेचे आहे असे बाल विकास प्रकल्प अधिकारी शारदा जाधव यांनी सांगितले.
त्यावेळी अंगणवाडी सेविका विजया जगताप अंगणवाडी मदतनीस सत्यभामा सुतार पालक अश्विनी गुजर श्रुती माने प्रियांका गुजर संगीता खताळ दुर्गा खिरवले व अंगणवाडीतील बालक उपस्थित होते.
