Home » ठळक बातम्या » आरोग्य » सामाजिक एकतेचा अनोखा संदेश

सामाजिक एकतेचा अनोखा संदेश

सामाजिक एकतेचा अनोखा संदेश: जमीअत उलमा ए हिंद, सातारा आणि मुस्लिम बांधव भुईंज यांच्या शिबिरात‎ हिंदू बांधवांचे देखील रक्तदान‎ ५५ जणांचे रक्तदान‎

भुईंज :-जमीअत उलमा ए हिंद, सातारा आणि मुस्लिम बांधव भुईंज यांच्या संयुक्त विद्यमाने आज जामा मस्जिद भुईंज येथे रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते.‎ या शिबिरात सामाजिक एकतेचा संदेश देत‎ ५५ दात्यांनी रक्तदान केले. या शिबिरात मुस्लिम बांधवाच्या बरोबरच हिंदू‎ बांधवांनी स्वयंस्फूर्तीने सहभाग नोंदवला होता.‎ येथील जामा मस्जिद भुईंज येथील रक्तदान शिबिरात हिंदू-मुस्लिम‎ समाजातील नागरिकांनी सहभागी होऊन‎ रक्तदान केले.

रक्तदान शिबिरास सातारा येथील जमीअत उलमा ए हिंदचे मुफ्ती अब्दुल्ला, मौलाना अब्दुल अलीम, सादिक शेख,अझर मुनीर,आरिफ खान तसेच भुईंज येथील माजी उपसरपंच प्रशांत जाधवराव, वि.का.स. सेवा सोसायटीचे चेअरमन मधुकर शिंदे सावकार,

आरिफ मोमीन, हुसेन मुलानी अय्याज शेख, अल्ताफ मोमीन, मुस्तफा मोमीन,शादाब मोमीन, मुन्ना मिस्त्री, इकबाल फरास, सोहेल मोमीन, सादिक मोमीन, आलम मणेर, साहिल मणेर, खालिद मोमीन, अजीम मुलानी, शकिल मोमीन, समीर मोमीन तसेच युवक व नागरिक उपस्थित होते.

याप्रसंगी‎ कोणास रक्ताची आवश्यकता असल्यास‎ त्यांनी जमीअत उलमा ए हिंद यांचेशी संपर्क साधावा,‎ असे आवाहन जमीअत उलमा ए हिंदच्या वतीने‎ करण्यात आले. शिबिरासाठी भुईंज येथील मुस्लिम‎ समाजाच्या सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले.‎ तर अक्षय ब्लड बँक सातारा यांनी‎ रक्तसंकलन केले.‎

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

सातारा जिल्हा बॉक्सिंग स्पर्धेत श्रीपतराव पाटील हायस्कूलला सुवर्ण झळाळी

Post Views: 60 सातारा जिल्हा बॉक्सिंग स्पर्धेत श्रीपतराव पाटील हायस्कूलला सुवर्ण झळाळी सातारा:करंजे पेठ येथील शिक्षण प्रसारक संस्था संचलित श्रीपतराव

Live Cricket