सनशाइन स्कूल खटावच्या बाल वारकऱ्यांचा रंगला दिंडी सोहळा
खटाव : महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. महाराष्ट्राला शेकडो वर्षांची वारकरी परंपरा आहे.आषाढी वारी ही महाराष्ट्राच्या संस्कृतीची ओळख आहे.महाराष्ट्रातील वारकऱ्यांनी ही परंपरा जपलेली आहे.येणाऱ्या पिढीने ही परंपरा जपावी व विद्यार्थ्यांमध्ये ही संस्कृती रुजावी यासाठी गौरीशंकरच्या सनशाइन इंग्लिश मीडियम स्कूल खटावचा बाल दिंडी सोहळा येणाऱ्या पिढीसाठी आदर्श ठरणार आहे.असे मत दिंडी सोहळा पूजन प्रसंगी रती मदनराव जगताप यांनी व्यक्त केले.

यावेळी आषाढी एकादशीनिमित्त दरवर्षीप्रमाणे खटाव येथील सनशाईन इंग्लिश मीडियम स्कूलचे विद्यार्थ्यांनी विठ्ठल रुक्मिणी, व महाराष्ट्रातील संतांच्या वेशभूषा साकारल्या होत्या.टाळ मृदंग व विठ्ठलाच्या नाम घोषात विद्यार्थ्यांनी या दिंडीमध्ये सहभाग घेतला. यावेळी डॉ. प्रिया महेशराव शिंदे, गौरीशंकर चे संचालक डॉ.अनिरुद्ध जगताप, प्राचार्या प्रमिला टकले,कार्यालय अधीक्षक वैभव जठार आदी मान्यवर उपस्थित होते.यावेळी विद्यार्थ्यांनी पारंपरिक वारकरी नृत्य सादर केले.या दिंडी मध्ये पालक व ग्रामस्थ सहभागी झाले होते.
विद्यार्थ्यांच्या या उपक्रमाबद्दल संस्थेचे अध्यक्ष प्रा.मदनराव जगताप, उपाध्यक्ष मिलिंद जगताप, संचालक जयवंतराव साळुंखे,आप्पा राजगे,प्रशासकीय अधिकारी नितीन मुडलगीकर,जनसंपर्क अधिकारी श्रीरंग काटेकर यांनी सर्वांचे कौतुक केले.




