अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची मने सैनिकांसाठी विद्यार्थ्यांचा प्रेमाचा धागा; ५०० जवानांना राख्या अन् मिठाई मंजू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या फॅशन डिझाईनिंग व हॉटेल मॅनेजमेंट विभागाचा उपक्रम गणेशोत्सव मंडळांनी विहित परवानगीसाठी अर्ज सादर करण्याचे-सहायक धर्मादाय आयुक्तांचे आवाहन नेपाळ पूरग्रस्त भागात अडकलेल्या नागरिकांसाठी बीजिंग व काठमांडू भारतीय दूतावासाचे हेल्पलाइन क्रमांक जाहीर ऐतिहासिक प्रतापसिंह महाराज उद्यानाच्या विकासासाठी ५ कोटींचा निधी मंजूर परिक्षा केंद व परीसरात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 लागू
Home » ठळक बातम्या » आरोग्य » खुबा व गुडघेदुखीने त्रस्त नव्या रुग्णांची साताऱ्यात मोफत तपासणी

खुबा व गुडघेदुखीने त्रस्त नव्या रुग्णांची साताऱ्यात मोफत तपासणी

खुबा व गुडघेदुखीने त्रस्त नव्या रुग्णांची साताऱ्यात मोफत तपासणी

सातारा : कमी वेदना, कमीत कमी रक्तस्त्राव, कमीतकमी हाडांचे नुकसान, जलद रिकव्हरी या वैशिष्ट्यांमुळे रुग्ण रोबोटिक सर्जरीला प्राधान्य देतात. रोबोटिक सर्जरी मधील पुण्यातील निष्णात डॉ. सौरभ गिरी हे येत्या गुरूवारी, १० जुलै रोजी सातारा डायग्नोस्टिक सेंटर येथे नवीन रुग्णांची गुडघा व खुबे वेदना तपासणी मोफत करणार आहेत.

नवीन नांव नोंदणी करणाऱ्या रुग्णांची गुडघा व खुबे वेदना तपासणी मोफत होईल. फॉलोअप पेशन्टना नेहमीचे शुल्क असेल. नव्या – जुन्या अशा दोन्ही रुग्णांना एक्सरे तपासणीत ५० टक्के सवलत दिली जाईल. डॉ. सौरभ गिरी यांनी सांगितले की, पारंपरिक शास्त्रक्रियेपेक्षा रोबोटिक शस्त्रक्रिया रुग्णांसाठी अधिक फलदायी व सुखकारक आहे. रोबोटिक शस्त्रक्रियेमध्ये संभाव्य धोके टाळता येतात. संक्रमणाचा धोकाही कमी असतो. रक्तस्त्राव कमी होतो. या शस्त्रक्रियेनंतर रुग्ण लवकर रिकव्हर होतो. त्यामुळे त्याचा रुग्णालयात ऍडमिट होण्याचा कालावधी कमी राहतो. विशेष म्हणजे रोबोटिक शस्त्रक्रियेनंतर काही तासात रुग्णाला चालता येते. त्यामुळे रोबोटिक शस्त्रक्रिया खुबा व गुडघेदुखीने त्रस्त असलेल्या रुग्णांसाठी आशेचा किरण ठरली आहे.

डॉ. सौरभ गिरी हे पुण्याच्या डेक्कन हर्डीकर हॉस्पिटलमध्ये रोबोटिक जॉइंट अँड रिप्लेसमेंट विभागाचे प्रमुख आणि एकॉर्ड हॉस्पिटलमध्ये ऑर्थोपेडिक आणि रोबोटिक जॉइंट रिप्लेसमेंट विभाग प्रमुख म्हणून कार्यरत आहेत. ते रुग्ण तपासणीसाठी १० जुलै रोजी दुपारी तीन पासून सातारा डायग्नोस्टिक सेंटर, देवी कॉलनी, सदरबझार येथे उपलब्ध आहेत. ज्येष्ठ नागरिक व गरजू रुग्णांनी या संधीचा लाभ घ्यावा. अधिक माहितीसाठी व नाव नोंदणीसाठी ९१६८४३२४३२ या हेल्प लाईनवर संपर्क साधावा, असे आवाहन सातारा डायग्नोस्टिक सेंटरने केले आहे.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची मने

अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची

Live Cricket