सीए फायनल एक्झाम मध्ये एकेज कॉमर्स अकॅडमी चा डंका
सातारा जिल्ह्यातील 21 विद्यार्थी-विद्यार्थिनी सीए परीक्षा उत्तीर्ण
सातारा : अवघड समजल्या जाणाऱ्या चार्टर्ड अकाउंटंट (सीए)अभ्यासक्रमाच्या अंतिम परीक्षेचा निकाल रविवारी दि इन्स्टिट्युट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट ऑफ इंडियातर्फे ऑनलाइन जाहीर करण्यात आला. यामध्ये सातारा जिल्ह्यातील 21 मुला-मुलींनी सीए फायनलची परीक्षा उत्तीर्ण केली. त्यामध्ये साताऱ्यातील एकेज् कॉमर्स अकॅडमीच्या तब्बल ११ मुलांचा समावेश आहे. सातारा जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी एकेज अकॅडमी सीए होण्याकरिता दीपस्तंभ ठरत आहे.
संपूर्ण भारतातून १४ हजार २४७मुलांनी सीए फायनलची परीक्षा उत्तीर्ण केली आहे. त्यामध्ये सातारा जिल्ह्यातील १० मुली, तर १० मुले उत्तीर्ण झाली आहेत. सीए झालेल्या मुला-मुलींची नावे पुढील प्रमाणे- सीए प्रणाली जाधव, धीरज यादव, जयश्री काशीद, सानिया जोशी, अक्ष हरवी, स्नेहल कदम, यश मेहता, पूजा राजपुरोहित, धनंजय ढाणे, तेजस मर्डा, पुष्कर कुलकर्णी, पल्लवी शिंदे, श्रद्धा अभ्यंकर, विक्रम जैन, हर्षदा थोरात, वैभव काडोळे, आरती ननावरे, मानसी जोशी, क्रिश बाफना, संकेत खिंवसरा, माधुरी फरांदे या यशस्वी विद्यार्थाचे एकेज कॉमर्स अकॅडमीचे सीए आनंद कासट यांनी कौतुक केले.
