राष्ट्रीय महामार्गावर विदेशी दारूची अवैद्य वाहतुक करणारे दोन जण ताब्यात ६ लाख १९ हजारांचा मुद्देमाल जप्त खंडाळा पोलीस स्टेशनची धडाकेबाज कारवाई महाबळेश्वर: एम. ई. एस. इंग्लिश मीडियम हायस्कूलच्या विद्यार्थिनींनी नगराध्यक्ष सुनील शिंदे यांना बांधली राखी; रक्षाबंधन सोहळा उत्साहात संपन्न केळघर बाजारपेठेत झेब्रा क्रॉसिंग, स्पीड ब्रेकर बसवा; अन्यथा आंदोलनाचा इशारा महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाची प्रशासनाकडे मागणी; नागरिकांच्या सुरक्षेसाठी तातडीने उपाययोजना करण्याचे आवाहन जि. प. सदस्या कविता ओंबळे यांची मागणी; जावळीतील शासकीय कार्यालयांत बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो लावण्याचे आवाहन तडीपार इसमाच्या मुसक्या आवळल्या; 3 गावठी पिस्टलसह 3.29 लाखांचा मुद्देमाल जप्त लोकमत वन वर्ल्ड समिटमध्ये यशोदा ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट चा सन्मान
Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » गौरीशंकर ने प्रवीणा कोकाटे हिला बेस्ट आउटगोइंग स्टुडन्ट पुरस्काराने गौरविले

गौरीशंकर ने प्रवीणा कोकाटे हिला बेस्ट आउटगोइंग स्टुडन्ट पुरस्काराने गौरविले

गौरीशंकर ने प्रवीणा कोकाटे हिला बेस्ट आउटगोइंग स्टुडन्ट पुरस्काराने गौरविले

गुणवत्ते बरोबरच संशोधन व मानवी मूल्य जपणूक च्या आधारे निवड

लिंब गौरीशंकर इन्स्टिट्यूट ऑफ फार्मासिटिकल एज्युकेशन अँड रिसर्च महाविद्यालय, लिंब येथे दरवर्षी औषध निर्माण क्षेत्रात महाविद्यालय स्तरावर उल्लेखनीय कार्य करणाऱ्या विद्यार्थ्यांना बेस्ट आउटगोइंग स्टुडन्ट हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते. शैक्षणिक वर्ष सन २०२४-२५ मधील हा पुरस्कार चतुर्थ वर्ष बी फार्मसी मध्ये शिकत असलेली प्रवीणा शहाजी कोकाटे या विद्यार्थिनीला प्राप्त झाला. तिचा संस्थेचे जनसंपर्क अधिकारी श्रीरंग काटेकर यांच्या हस्ते प्रमाणपत्र, बुके व भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संतोष बेल्हेकर, डॉ. भूषण पवार, डॉ. धैर्यशील घाडगे, प्रा. माधुरी मोहिते, प्रा. निलम पवार आदी प्रमुख उपस्थित होते.

विद्यार्थ्यांमधील गुणवत्तेला प्राधान्यक्रम देण्याबरोबरच त्यांच्या कल्पकतेला अधिक चालना देण्यासाठी विविध उपक्रमातून विद्यार्थ्यांना महाविद्यालयाकडून प्रोत्साहन दिले जाते. विद्यार्थ्यांना शैक्षणिक ज्ञानाबरोबरच मानवी मूल्यांचे संस्कार घडवणे तितकेच महत्त्वाचे आहे. त्या दृष्टीने महाविद्यालय विद्यार्थ्यांची जडणघडण करीत असते. याच निकषाच्या आधारे दरवर्षी बेस्ट आउटगोइंग स्टुडन्ट पुरस्कारासाठीं विद्यार्थ्यांची निवड केली जाते.अशी माहिती प्राचार्य डॉ. संतोष बेल्हेकर यांनी दिली. प्रास्ताविक व आभार प्रशांत शेडगे यांनी केले. 

औषध निर्माण क्षेत्रातील उच्च ज्ञान घेणारी प्रवीणा शहाजी कोकाटे हिने अत्यंत प्रतिकूल परिस्थितीशी झगडत शिक्षण घेऊन या क्षेत्रात स्वतःचे आगळे वेगळे स्थान निर्माण केले आहे. गुणवत्तेबरोबरच दैनंदिन जीवनात तिने मानवी मूल्यांचे जतन केले आहे. सलग चार वर्ष महाविद्यालय स्तरावर कला, क्रीडा व सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी तिने सातत्याने केली आहे. नाविन्यपूर्ण संशोधन व कल्पकता या जोरावर विविध स्पर्धात्मक स्पर्धेत तिने चमकदार कामगिरी केलेली आहे. या क्षेत्रातल्या दिग्गजांनी तिच्या कार्याचे कौतुक केले आहे. म्हणूनच महाविद्यालयाने तिला बेस्ट आउटगोइंग स्टुडन्ट पुरस्कारासाठी तिची निवड केली आहे. फोटो… बेस्ट आउटगोइंग स्टुडन्ट पुरस्कार प्राप्त विद्यार्थिनी प्रविना कोकाटे हिचा सत्कार करताना श्रीरंग काटेकर समवेत डॉ. संतोष बेल्हेकर, डॉ भूषण पवार, डॉ. धैर्यशील घाडगे, प्रा. माधुरी मोहिते इत्यादी..

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

राष्ट्रीय महामार्गावर विदेशी दारूची अवैद्य वाहतुक करणारे दोन जण ताब्यात ६ लाख १९ हजारांचा मुद्देमाल जप्त खंडाळा पोलीस स्टेशनची धडाकेबाज कारवाई

राष्ट्रीय महामार्गावर विदेशी दारूची अवैद्य वाहतुक करणारे दोन जण ताब्यात ६ लाख १९ हजारांचा मुद्देमाल जप्त खंडाळा पोलीस स्टेशनची धडाकेबाज

केळघर बाजारपेठेत झेब्रा क्रॉसिंग, स्पीड ब्रेकर बसवा; अन्यथा आंदोलनाचा इशारा महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाची प्रशासनाकडे मागणी; नागरिकांच्या सुरक्षेसाठी तातडीने उपाययोजना करण्याचे आवाहन

Live Cricket