Home » राज्य » शेत शिवार » शेणोली ते रेठरे कारखाना रस्त्यावरील वृक्षतोड जोरदार सुरु

शेणोली ते रेठरे कारखाना रस्त्यावरील वृक्षतोड जोरदार सुरु

शेणोली ते रेठरे कारखाना रस्त्यावरील वृक्षतोड जोरदार सुरु

ठेकेदार कंपनीकडून झाडे तोडण्याची घाई 

तांबवे – शेणोली ते साजुर दरम्यान सुरू असलेल्या रस्त्याच्या कडेला असणाऱ्या झाडावर ठेकेदारांनी चांगलीच कु-हाड घातली असुन पर्यावरण दिना दिवसीच वृक्ष तोड सुरू आहे.संबंधित ठेकेदाराने वृक्षतोड करताना कसलीही सुरक्षा पाळली नाही.

शासनाच्या एम एस आय डी सी विभागातून शेणोली ते साजूर या रस्त्यावर 228 कोटी निधी मंजूर झाला आहे.ते 39किलो मीटरचे हे काम आहे. शेणोली ते साजुर या रस्ता चे काम सुरू आहे. 

शेणोली ते साजुर या भागातील रस्त्यांच्या दुतर्फा असणारे झाडे आहेत. या रस्त्यावरील दुतर्फा असणारे वृक्ष तोडण्याची काम सध्या सुरू आहे.शासन एका बाजूला झाडे लावा झाडे जगवा असा संदेश देत आहे.आणि एका बाजूला रस्त्याचा विकास नावाखाली रस्त्याच्या कडेला असणारे झाड तोडली जात आहेत.सध्या शेणोली ते शिवनगर दरम्यान असणारे रस्त्याच्या दुतर्फा असणारे वृक्ष तोड सूरू आहे.जेवढी झाडे तोडली जाणार तेवढी लावणार का असा प्रश्न पडतो.तसेच झाडे तोडताना ठेकेदाराने कसलीही सुरक्षा पाळत नाहीत.झाडे तोडणारे मजुरांना कसलाही सुरक्षा दिली नाही .रस्त्यावर बॅरिकेड्स न लावता झाडे तोड सुरू आहे ‌. शेणोली ते साजुर रस्त्यावरील दुतर्फा अनेक प्रकारची झाडे आहेत.ही वृक्षसंपदा गेली अनेक वर्षे पासुन चांगल्या प्रकारे जतन केली आहे .या रस्त्यावरील वृक्षतोड जोरदार सुरु आहे.

 ५ जून जागतिक पर्यावरण दिन आहे.या दिवशी ही शेणोली ते शिवनगर दरम्यान ही वृक्षतोड जोरात सुरू आहे.यावर कुणाचा अंकुश दिसत नाही.ठेकेदार मनमानी पद्धतीने काम करत आहेत.रस्त्याच्या कडेला तोडली जाणारी झाडे पुन्हा लावली जाणार का असा प्रश्न ग्रामस्थ विचारत आहेत.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

सातारा जिल्हा बॉक्सिंग स्पर्धेत श्रीपतराव पाटील हायस्कूलला सुवर्ण झळाळी

Post Views: 59 सातारा जिल्हा बॉक्सिंग स्पर्धेत श्रीपतराव पाटील हायस्कूलला सुवर्ण झळाळी सातारा:करंजे पेठ येथील शिक्षण प्रसारक संस्था संचलित श्रीपतराव

Live Cricket