Home » Uncategorized » आपला राजकीय उदरनिर्वाह काँग्रेस पक्षाचे जीवावर झाला आहे याचे भान विध्यमान भाजपा जिल्हाध्यक्ष यांनी ठेवावे -रवींद्र साळुंखे -पाटील

आपला राजकीय उदरनिर्वाह काँग्रेस पक्षाचे जीवावर झाला आहे याचे भान विध्यमान भाजपा जिल्हाध्यक्ष यांनी ठेवावे -रवींद्र साळुंखे -पाटील

आपला राजकीय उदरनिर्वाह काँग्रेस पक्षाचे जीवावर झाला आहे याचे भान विध्यमान भाजपा जिल्हाध्यक्ष यांनी ठेवावे -रवींद्र साळुंखे -पाटील 

 सातारा – माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण बाबा मुख्यमंत्री असताना आपण त्यांच्या व तत्कालीन काँग्रेस च्या जिल्हाध्यक्ष च्या मागे फिरत होता.आपला खाजगी कारखान्याचा प्रवास सुखर व सरळ व्हावा म्हणून कोटीचा निधी मागण्यासाठी आपणच पाठी पुढे करीत होता त्यामुळे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण बाबा यांची काळजी आपण करू नये असा टोला रवींद्र साळुंखे पाटील यांनी आमदार अतुल भोसले यांना लगावला आहे.

 ते पुढे म्हणाले चौथीच्या मुलीला जर प्रोत्साहन देण्यास माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण बाबा जात असतील तर ते पृथ्वीराज चव्हाण बाबा यांचे मोठेपण आणि माजी मुख्यमंत्री यांची जनतेशी जुळललेली नाळ आणि बांधिलकीच त्यातून दिसते तुम्ही लोकांच्या हातात हात दिला तर बिसलेरी ने हात धुत होता अशी सरास 2009 ला ओरड होती कार्यकर्त्यांची असा संकुचितपणा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण बाबा यांच्यामध्ये नाही हे लोकनेत्याचे लक्षण आहे.

माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज बाबा यांचे मुंबईतील असो या कराड मधील सर्वांसाठी दरवाजे खुले असतात त्यामुळे सद्बुद्धी कोणाला आली पाहिजे याचे आत्मचिंत आपण करावे.माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण बाबा यांनी मस्करवाडी डोंगरकपारीत सारख्या ठिकाणी अत्याधुनिक हॉस्पिटल शासकीय निर्माण केले आहे ते जनतेसाठी सतत खुले आहे त्यातून पाटण तालुक्यातील आडवळणी असणाऱ्या गावांची आरोग्य उपचाराची सोय झाली आहे ते शेतकऱ्यांच्या मालकीचा हॉस्पिटल नाही आणि त्यावर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण बाबानी कधी हक्क दाखवला नाही या श्रेय घेण्याचा प्रयत्न ही केला नाही ते जनतेस समर्पित केले आहे .

माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण बाबा यांनी चोरे सारख्या 2 किलोमीटर नदी असूनही दुष्काळी भाग झाला होता तिथे स्थायी साखळी बंदारे बांधून शाश्वत पाणीसाठा करून लोकांच्या विहीरीच्या माध्यमातुन बागायती शेती होऊ लागली आहे हा असा विकास माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण बाबाच करू शकतात.

 2009 कराड उत्तर मधून निवडणूक लढताना चोरे विभागाला पाणी देतो बोलला आणि नंतर पराभूत झाल्यानंतर आजतागायत तिकडे फिरकला नाही ही तुमची जनतेप्रति संवेदना आणि विकासकामे.विध्यमान जिल्हाध्यक्ष यांनी काँग्रेस ची काळजी करू नये काँग्रेस ने अशी वादळे खूप पाहिली आहेत आणि ती वादळे परतवून ही लावली आहेत काँग्रेस एक विचार आहे आणि त्या विचारांच प्रतीक माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण बाबा हे आहेत सत्ता असो नसो आपल्यावर ज्या पक्षाचे संस्कार व उपकार आहेत ते कधीच विसरत नाहीत .आपल्या स्वर्गीय चुलत सासऱयांचा एक भाषणात काँग्रेस पक्षाचा पूर्ण सारांश आहे काँग्रेस एक विचार आहे ती लोकांची चळवळ आहे तिला संपवणारे संपले पण कॉंग्रेस संपली नाही आणि संपणार ही नाही. असे निवेदनात म्हटले आहे.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

प्रशासनाच्या प्रभावी नियोजनात पाचगणी नगरपरिषद निवडणूक शांततेत पार

Post Views: 141 प्रशासनाच्या प्रभावी नियोजनात पाचगणी नगरपरिषद निवडणूक शांततेत पार पाचगणी- पाचगणी गिरीस्थान नगरपरिषद निवडणूक २०२५ प्रशासनाच्या काटेकोर नियोजनात

Live Cricket