Post Views: 441
जिल्हा परिषद शाळेत प्रवेश घेतल्यास घरपट्टी माफ बावधन तालुका वाई ग्रामपंचायत चा अनोखा निर्णय
सातारा – बावधन ग्रामपंचायतीने जिल्हा परिषद शाळेत प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांचा घर कर माफ करण्याचा निर्णय घेतला आहे. या स्तुत्य उपक्रमामुळे गावातील सरकारी शिक्षणाला प्रोत्साहन मिळणार आहे.
यामुळे ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षणाकडे विद्यार्थ्यांचा कल वाढणार असून ग्रामपंचायतच्या या निर्णयाचे ग्रामीण पालकाकडून स्वागत होत आहे.जिल्हा परिषद आदर्श प्राथमिक शाळा बावधन येथे अनेक विद्यार्थ्यांनी आपले शिक्षण पूर्ण करण्याबरोबरच यशस्वी करिअर घडविले आहे.
