नायगावात रंगणार भक्तीचा जागर; ज्ञानेश्वरी पारायण व अखंड हरिनाम सप्ताहाला उद्यापासून प्रारंभ शेखर गोरे १ सप्टेंबरला शिवसेनेत प्रवेश करणार; माण-खटावच्या राजकारणात नवे समीकरण राष्ट्रीय महामार्गावर विदेशी दारूची अवैद्य वाहतुक करणारे दोन जण ताब्यात ६ लाख १९ हजारांचा मुद्देमाल जप्त खंडाळा पोलीस स्टेशनची धडाकेबाज कारवाई महाबळेश्वर: एम. ई. एस. इंग्लिश मीडियम हायस्कूलच्या विद्यार्थिनींनी नगराध्यक्ष सुनील शिंदे यांना बांधली राखी; रक्षाबंधन सोहळा उत्साहात संपन्न केळघर बाजारपेठेत झेब्रा क्रॉसिंग, स्पीड ब्रेकर बसवा; अन्यथा आंदोलनाचा इशारा महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाची प्रशासनाकडे मागणी; नागरिकांच्या सुरक्षेसाठी तातडीने उपाययोजना करण्याचे आवाहन जि. प. सदस्या कविता ओंबळे यांची मागणी; जावळीतील शासकीय कार्यालयांत बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो लावण्याचे आवाहन
Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » जयसिंगराव मल्हारी करपे हायस्कूलला विशाल शिंदेंची २५००० रुपयांची देणगी

जयसिंगराव मल्हारी करपे हायस्कूलला विशाल शिंदेंची २५००० रुपयांची देणगी

जयसिंगराव मल्हारी करपे हायस्कूलला विशाल शिंदेंची २५००० रुपयांची देणगी

वर्ये : येथील रयत शिक्षण संस्थेच्या जयसिंगराव म्ह्ल्हारी करपे हायस्कूल येथे १८ मे २०२५ रोजी माजी विद्यार्थ्यांनी स्नेह मेळाव्याचे आयोजन केले होते. २००३ ला १० वीला असणारे विद्यार्थी व विद्यार्थिनी एकत्र येऊन आपल्या शाळेतल्या सुख दुःखाच्या आठवणी व्यक्त केल्या. २२ वर्षांनी एकत्र आलेले विद्यार्थी शाळेच्या आवारात रमून गेले . आपापल्या व्यवसायात ,संसारात नित्य मग्न असलेल्या या विद्यार्थ्यांच्या मनात शाळेसाठी आपण काहीतरी केले पाहिजे याची जाणीव झाली…..दुसऱ्या दिवशी सोमवारी त्यातीलच एक संवेदनशील व जाणीव असलेल्या विद्यार्थ्याने एक सुखद धक्का दिला. शाळेतल्या सोबत्यांसोबत आनंद मिळालाअसला तरी त्यातील एक दोन विद्यार्थ्याच्या मनात ,मला घडवणारी ही शाळा तिला काही अडचणी आहेत का ? ही संवेदना जन्मास आली. याच बॅचचे आज पोलीस दलात काम करणारे तत्कालीन विद्यार्थी विशाल शिंदे व सुधीर बेबले या विद्यार्थ्यांच्या मनात शाळेसाठी मदत करण्याची भावना निर्माण झाली. आणि दुसऱ्याच दिवशी शाळेतील विद्यार्थ्यांशी जिव्हाळ्याचे सबंध असणारे माजी शिक्षक सुधाकर शिंदे यांना घेऊन ते मुख्याध्यापक सुनिता वाघमारे यांना भेटले. विद्यालयाच्या एका खोलीची दुरुस्ती करण्याची गरज लक्षात घेऊन श्री.विशाल शिंदे यांनी खोलीच्या नूतनीकरणासाठी २५००० रुपयांचा चेक मुख्याध्यापक वाघमारे यांना दिला. वाघमारे यांनी विशाल शिंदे यांचे कौतुक केले व आभार मानून रयत शिक्षण संस्थेच्या प्रत्येक शाखेत माजी विद्यार्थी संघटना नोंदणी करण्याबाबत च्या परिपत्रकाची माहिती त्यांना दिली. तसेच विद्यालयाचे सर्व माजी विद्यार्थी एकत्र येऊन शाळेच्या विकासासाठी योगदान देण्याच्या बाबत आवाहन केले. माजी विद्यार्थी यांचे दातृत्व म्हणजे केवळ आर्थिक मदत नाही तर पुढील पिढीला घडविण्यासाठीची सामाजिक जबाबदारी महत्त्वाची भूमिका ठरते.ही परंपरा आपण सर्व विद्यार्थी निर्माण करत आहात ही गोष्ट निश्चितच प्रेरणादायी आणि आम्हा सर्व शिक्षकांसाठी अभिमानाची आहे असे त्या म्हणाल्या. हायस्कूलचे स्थानिक व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी ,सदस्य ,शिक्षक यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे .

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

नायगावात रंगणार भक्तीचा जागर; ज्ञानेश्वरी पारायण व अखंड हरिनाम सप्ताहाला उद्यापासून प्रारंभ

नायगाव येथे उद्यापासून ज्ञानेश्वरी सामुदायिक पारायण सोहळा केळघर/प्रतिनिधी : कोरेगाव तालुक्यातील नायगाव येथे श्री ज्ञानेश्वरी सामुदायिक पारायण सोहळा व अखंड

केळघर बाजारपेठेत झेब्रा क्रॉसिंग, स्पीड ब्रेकर बसवा; अन्यथा आंदोलनाचा इशारा महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाची प्रशासनाकडे मागणी; नागरिकांच्या सुरक्षेसाठी तातडीने उपाययोजना करण्याचे आवाहन

Live Cricket