जिल्हास्तरीय बॅडमिंटन स्पर्धांना स्पर्धकांचा उदंड प्रतिसाद – वाईत मान्यवरांच्या उपस्थितीत बक्षिस वितरण सोहळा
आदरणीय स्व प्रतापराव (भाऊ) भोसले यांच्या स्मरणार्थ आयोजित जिल्हास्तरीय बॅडमिंटन स्पर्धा किसन वीर महाविद्यालयाच्या इनडोअर स्पोर्ट्स हॉलमध्ये दि १७ मे २०२५ ते १९ मे २०२५ या कालावधीत संपन्न झाल्या. सातारा जिल्हा बॅडमिंटन असोशिएशन, सातारा यांच्या मान्यतेने वाई जिमखाना, वाई आणि किसन वीर महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या स्पर्धेला , संपूर्ण सातारा जिल्ह्यातील विविध वयोगटांतील एकूण २०९ खेळाडूंनी या स्पर्धेत सहभाग घेतला होता.
स्पर्धेचे उद्घाटन वैद्यकीय क्षेत्रातील ज्येष्ठ व्यक्तिमत्त्व आणि कार्यक्रमाचे उद्घाटक मा. डॉ. शरद अभ्यंकर, सातारा जिल्हा बॅडमिंटन असोशिएशनच्या अध्यक्षा मा. वृषालीराजे भोसले, जिल्हा बॅडमिंटन सचिव श्री. निलेश फणसळकर, जनता शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा. मदनदादा भोसले, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गुरुनाथ फगरे, संचालक श्री सुरेश यादव तसेच वाईतील सामाजिक कार्यकर्ते श्री. मदनकुमार साळवेकर आदी मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला.
याप्रसंगी खेळाडूंना मार्गदर्शन करताना मा. डॉ. शरद अभ्यंकर यांनी आदरणीय प्रतापराव (भाऊ) भोसले यांच्याशी संबंधित आपल्या जुन्या आठवणींना उजाळा दिला. त्यांनी उपस्थित खेळाडूंना “भरपूर खेळा आणि भरपूर वाचा” असा प्रेरणादायी संदेश दिला. सातारा जिल्हा बॅडमिंटन असोशिएशनच्या अध्यक्षा मा. वृषालीराजे भोसले यांनी सर्व आयोजकांचे मन:पूर्वक आभार मानले आणि खेळाडूंना यशासाठी शुभेच्छा दिल्या. या वेळी प्राचार्य डॉ. गुरुनाथ फगरे यांनी वाई जिमखानाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी केलेल्या अथक परिश्रमांचे विशेष कौतुक करत, अशा उपक्रमांमुळे विद्यार्थी व युवा खेळाडूंना योग्य व्यासपीठ मिळते असे मत व्यक्त केले.
स्पर्धेचा बक्षिस वितरण सोहळा सोमवार दि १९ मे २०२५ रोजी दु ४ वा राष्ट्रीय खेळाडू मा श्री महेश सटवे, उत्कर्ष नागरी सहकारी पतसंस्थेच्या संचालिका डॉ मंगला अहिवळे, सातारा जिल्हा बॅडमिंटन असोशिएशनचे उपाध्यक्ष श्री राजदीप माजगावकर, कायदे तज्ञ ॲड रूपा पोरे – गाडेकर, ज्येष्ठ बॅडमिंटन खेळाडू मा श्री शरीफ सलाटी या मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला.
याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष मा श्री मदन दादा भोसले यांनी स्व प्रतापराव भोसले व स्व आनंद कोल्हापुरे यांनी बॅडमिंटन कोर्ट चे त्यावेळी पाहिलेले स्वप्न आज वाई जिमखान्याचे सर्व पदाधिकारी यांच्या प्रयत्नातून खऱ्या अर्थाने साकार झाल्याचे मत व्यक्त केले. तसेच अश्याच दर्जेदार स्पर्धा दरवर्षी घ्याव्यात अशी देखील इच्छा याप्रसंगी मांडली.
या स्पर्धेत एकेरी मध्ये ९ वर्षाखालील मुले गटात विजेता रेयांश राउत, उपविजेता राजवीर धुमाळ, ९ वर्षाखालील मुली गटात विजेती आरोही अर्जुगडे, उपविजेती अधीरा जाधव, ११ वर्षाखालील मुले गटात विजेता रेयांश राउत, उपविजेता अक्षय कोल्हापुरे, ११ वर्षाखालील मुली गटात विजेती शरयू कदम, उपविजेती आरोही अर्जुगडे, १३ वर्षाखालील मुले गटात विजेता भावेश घोडके, उपविजेता श्लोक भोसले, १३ वर्षाखालील मुली गटात विजेतीमिताली महामुनी, उपविजेती श्रद्धा इंगळे, १५ वर्षाखालील मुले गटात विजेता नील दीक्षित, उपविजेता कौस्तुभ फुले, १५ वर्षाखालील मुले गटात विजेती सूर्या कणसे, उपविजेती श्रद्धा इंगळे, १७ वर्षाखालील मुले गटात विजेता ओम मुळे , उपविजेता अर्जुन जाधव, १७ वर्षाखालील मुली गटात विजेती सूर्या कणसे, उपविजेती मिताली महामुनी, १९ वर्षाखालील मुले गटात विजेता तनिश्क़ केंजळे, उपविजेता अथर्व करणे, १९ वर्षाखालील मुली गटात विजेती सूर्या कणसे, उपविजेती किया वोरा, खुला मुले गटात विजेता ईशान वाळिंबे, उपविजेता सोहेल सलाटी, खुला मुली गटात विजेती किया वोरा, उपविजेती शर्वरी मोरे पाटील, दुहेरी मध्ये १५ वर्षाखालील मुले गटात विजेते कौस्तुभ फुले व शराव लोखंडे, उपविजेते कनक जोशी व शोनक घसासी, १५ वर्षाखालील मुली गटात विजेते आदिती अडमाने व श्रद्धा इंगळे, उपविजेते अन्विता देशमुख व शिवांजली गायकवाड, १७ वर्षाखालील मुले गटात विजेते ओम मुळे व राजवीर डुबल, उपविजेते अर्जुन जाधव व नील दीक्षित, खुला मुले गटात राजेश्वर कान्हेरे व तनिश्क़ केंजळे, उपविजेते अथर्व पालकर व ओमकार पालकर, खुला मुली गटात विजेते ऐश्वर्या आरडे व यामिनी सूर्यवंशी, उपविजेते श्रावणी जाधव व सूर्या जाधव, दुहेरी पुरुष ३५ वर्षावरील गटात विजेते अतुल पाटील व ओमकार पालकर, उपविजेते वैभव फुले व निलेश फणसळकर, ४५ वर्षावरील गटात विजेते अजय बोराटे व समीर शेख, उपविजेते सायमन नडार व स्वरूप मुळे, ५५ वर्षावरील गटात विजेते अवधूत जोशी व संजय भागवत, उपविजेते सायमन नडार व रफिक मुजावर यांनी यश संपादन केले. तसेच या स्पर्धेत वयाने सर्वात लहान असणाऱ्या विराज वैभव फुले याचा स्पर्धेतील उत्साहपूर्ण सहभाग व त्याचे एवढ्या लहान वयात या खेळातील प्राविण्य पाहता मा श्री शरीफ सलाटी यांनी त्याचा सन्मानचिन्ह देऊन विशेष गौरव केला.
याप्रसंगी वाई जिमखाना वाई चे अध्यक्ष श्री अमर कोल्हापुरे यांनी सर्व यशस्वी खेळाडूंचे कौतुक केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. या स्पर्धेसाठी उत्कर्ष नागरी सहकारी पतसंस्था, रॉयलवे, मॅप्रो फूड्स यांनी आर्थिक मदत केली. स्पर्धा प्रमुख श्री वैभव फुले यांनी सर्वांचे आभार मानले.
यावेळी वाई जिमखान्याचे संचालक श्री अमीर बागुल, श्री नितीन वाघचौडे, सौ प्रीती कोल्हापुरे, तसेच श्री सायमन नडार, श्री मोहन आबा भोसले, श्री अफजल पठाण, श्री समीर पवार उत्कर्ष पतसंस्थेचे मुख्य व्यवस्थापक श्री प्रकाश पवार, किसनवीर महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापक व उत्कर्ष पतसंस्थेचे कर्मचारी वृंद उपस्थित होते.
