सह्याद्री बँकेवर २५ वर्षांनंतर सत्तांतर अमित चव्हाण यांच्या सह्याद्री परिवार पॅनेलचा १३-० विजय
सातारा : सह्याद्री मध्यवर्ती सहकारी बँक, मुंबई वरील पुरुषोत्तम माने यांची २५ वर्षांची सत्ता उलथवून टाकत भाजपचे पश्चिम महाराष्ट्र सह समन्वयक अमित चव्हाण यांच्या नेतृत्वाखालील सह्याद्री परिवार पॅनेलने १३ पैकी १३ जागा जिंकून निर्विवाद विजय मिळवला आहे.
सह्याद्री मध्यवर्ती सहकारी बँक निवडणुकीचा निकाल आज जाहीर झाला. श्री चव्हाण यांच्या नेतृत्वातील सह्याद्री परिवार पॅनेलचे १३ पैकी १३ उमेदवार विजयी झाले आहे. यामध्ये सह्याद्री परिवार पॅनलचे पांडुरंग गोसावी, मोमीन शौकत, संपत रास्ते, मोहिनी देशमुख, संजीवनी जाधव, रामदास चव्हाण, संतोष धुमाळ, वसंत घाडगे, गोरख महाडिक, हेमंत निंबाळकर, अशोक फाळके, अरविंद साळुखे, विजय शेलार आदी उमेदवार विजयी झाले.
या विजयाबद्दल अमित चव्हाण व नवनिर्वाचित संचालक मंडळाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत बावनकुळे, कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण, भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस आमदार श्रीकांतजी भारतीय ,बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, खासदार उदयनराजे भोसले, आमदार महेश शिंदे, आमदार योगेश सागर, जिल्हाध्यक्ष आमदार अतुल भोसले आदी मान्यवरांनी अभिनंदन केले.
