Post Views: 138
मान्सून अरबी समुद्रात दाखल
मान्सून अरबी समुद्रात दाखल झाला आहे. अरबी समुद्रासोबतच मालदीव, बंगालचा उपसागर आणि अंदमानच्या काही भागात मान्सून पुढे सरकला असून येत्या २७ मेपर्यंत मान्सून केरळमध्ये दाखल होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. तर महाराष्ट्रात ७ जूनपर्यंत मान्सून दाखल होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
राज्यात पुढील ४ ते ५ दिवसांत मध्यम ते तीव्र गडगडाटासह जोरदार वारे आणि काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.महाराष्ट्रात साधारण ७ जूनपर्यंत मान्सून दाखल होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, सोसाट्याचा वारा आणि मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
