Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » महाबळेश्वरची तनिषा भांगडिया हिचा ऐतिहासिक विक्रम ICSE बारावी परीक्षेत ९९.२५% गुण

महाबळेश्वरची तनिषा भांगडिया हिचा ऐतिहासिक विक्रम ICSE बारावी परीक्षेत ९९.२५% गुण

महाबळेश्वरची तनिषा भांगडिया हिचा ऐतिहासिक विक्रम ICSE बारावी परीक्षेत ९९.२५% गुण

महाबळेश्वर: महाबळेश्वरची विद्यार्थिनी तनिषा भांगडिया हिने ICSE बारावी परीक्षेत तब्बल ९९.२५% गुण मिळवत संपूर्ण परिसराचा अभिमान वाढवला आहे. तनिषा ही देहराडून येथील प्रसिद्ध वेल्हॅम गर्ल्स स्कूलची विद्यार्थिनी आहे.

तिच्या या यशामुळे तिचे कुटुंब, शाळा आणि संपूर्ण महाबळेश्वर शहरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. तनिषा ही लहानपणापासूनच अभ्यासात हुशार असून, तिच्या यशामागे सातत्य, मेहनत आणि शिस्तीचे योगदान असल्याचे तिचे शिक्षक व पालक सांगतात. तिच्या यशाबद्दल बोलताना तनिषा म्हणाली, माझ्या या यशामध्ये माझ्या आई-वडिलांचे, शिक्षकांचे आणि मित्रांचे मोलाचे योगदान आहे. महाबळेश्वर शहरात तिच्या या उल्लेखनीय कामगिरीमुळे आनंदाची लाट पसरली असून, सर्वत्र तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. 

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

कुंभरोशी गणात पंचरंगी ‘डोस’ राष्ट्रवादी, भाजप, शिवसेनेच्या ताकदीसमोर अपक्षांचे आव्हान; निवडणूक चुरशीची होणार

कुंभरोशी गणात पंचरंगी ‘डोस’ राष्ट्रवादी, भाजप, शिवसेनेच्या ताकदीसमोर अपक्षांचे आव्हान; निवडणूक चुरशीची होणार महाबळेश्वर प्रतिनिधी-महाबळेश्वर तालुक्यातील कुंभरोशी गण पंचायत समिती

Live Cricket