Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » उन्हाळ्यात अशा पद्धतीने घ्या त्वचेची काळजी

उन्हाळ्यात अशा पद्धतीने घ्या त्वचेची काळजी

उन्हाळ्यात अशा पद्धतीने घ्या त्वचेची काळजी

उन्हाळ्यात त्वचेची विशेष काळजी घ्यावी लागते कारण, ह्या ऋतुमधील कडक उन्हाचा आणि हवेतील कोरडेपणाचा त्वचेवर परिणाम होतो. तीव्र उन्हामुळे त्वचा लाल होते, काळी पडते, कोरडी होते आणि निस्तेज दिसू लागते.

उन्हापासून त्वचेचे संरक्षण करणे  अतिशय महत्वाचे आहे. त्यासाठी, उन्हात बाहेर पडणार असाल तर छत्री अथवा डोक्याचा रुमाल किंवा टोपीचा वापर करा. डोळ्यांभोवतीची त्वचा चेहर्‍याच्या इतर त्वचेच्या तुलनेत नाजुक असते, म्हणूनच उन्हात जाताना सन ग्लासेस घाला. तसेच सनस्क्रीनचा वापर करा.उन्हाळ्यामध्ये खूप मेकअप वापरू नका, कारण त्वचेला श्वास घेऊ देणे महत्वाचे आहे. उन्हाळ्यामध्ये पावडर स्वरुपातील मेकअप उत्पादने वापरणे केंव्हाही चांगले. ह्या ऋतूमध्ये ओठ कोरडे पडतात. त्यांची काळजी घेण्यासाठी  लिप बामचा वापर करा.

घाम आणि चिकटपणामुळे त्वचेची रंध्रे मोकळी राहत नाहीत. त्यांना मोकळे ठेवण्यासाठी काकडी किंवा आलोवेरा असलेला टोनर वापरा.अनेक वेळा उन्हाळ्यात डोळ्यांची तसेच त्वचेचीही आग किंवा जळजळ होते. तसे होत असल्यास, डोळ्यांवर आणि त्वचेच्या त्या भागावर थंड पाण्याच्या पट्ट्या किंवा काकडीचे तुकडे ठेवा. असे केल्याने आग किंवा जळजळ होणे तर थांबतेच पण शरीरातील उष्णताही कमी होते.

चंदन, आमसूल, ताक/दही ह्यांसारखे पदार्थ त्वचेवर लावल्याने शरीरातील उष्णता कमी होते आणि उष्णतेमुळे होणारे त्वचेचे विकारही होत नाहीत.त्वचेवर पुरळ किंवा घामुळे आले असल्यास अथवा उन्हामुळे त्वचेची आग होत असल्यास चंदनाचा लेप लावा, कढीलिंबाचा लेप लावा, किंवा ताक, दही अशा थंड पदार्थांचा वापर करा. शरीरातील उष्णता वाढू नये ह्यासाठी भरपूर पाणी तसेच इतर थंड पदार्थ ह्यांचा दैनंदिन आहारात समावेष करणे खूप महत्वाचे आहे. आशा प्रकारे त्वचेची योग्य काळजी घेतलीत तर उन्हाळ्यातही तुमाचा चेहरा तजेलदार आणि टवटवीत दिसू शकेल आणि त्वचेचे उन्हाळ्यात उद्भवणारे आजार तुम्हाला होणार नाहीत.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

प्रवासी हा एकमेव केंद्रबिंदू नजरेसमोर ठेवून प्रवाशांना उत्तमोत्तम सेवा-आगार व्यवस्थापक महेश जाधव

Post Views: 51 प्रवासी हा एकमेव केंद्रबिंदू नजरेसमोर ठेवून प्रवाशांना उत्तमोत्तम सेवा-आगार व्यवस्थापक महेश जाधव महाबळेश्वर ता:१:सुरक्षित सेवेमुळे एसटी महामंडळाने

Live Cricket