कुडाळ गटात भाजपच्या सौ जयश्रीताई गिरीचां प्रचाराचा झंझावात साताऱ्याच्या अस्मितेला सुरेल सलाम’आम्ही सातारी’ गीताचा मंगळवारी शाहू कलामंदिरात भव्य प्रकाशन सोहळा कोडोलीच्या सुपुत्राचा राष्ट्रीय स्तरावर गौरव; उस्मानाबादी शेळी संवर्धनासाठी ‘NBAGR’ कडून विशेष सन्मान  कुंभरोशी गणात ‘कमळ’ फुलणार? सामाजिक कार्याचा वारसा अन् दांडगा अनुभव असलेले सुरेश जाधव रिंगणात! गौरीशंकर सुखात्मे स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न विद्यार्थ्यांच्या कलाविष्काराचे रसिक प्रेक्षकांकडून झाले कौतुक  लढायचं परिवर्तनासाठी, लढायचं विकासासाठी! – श्री. सुभाष महादेव सोंडकर यांना भाजपची अधिकृत उमेदवारी
Home » राज्य » प्रशासकीय » महाबळेश्वर महापर्यटन उत्सव अंतर्गत सुरू असलेली कामे मुदतीत पूर्ण करावी-पर्यटन मंत्री मा.ना.शंभूराज देसाई

महाबळेश्वर महापर्यटन उत्सव अंतर्गत सुरू असलेली कामे मुदतीत पूर्ण करावी-पर्यटन मंत्री मा.ना.शंभूराज देसाई 

महापर्यटन उत्सव अंतर्गत सुरू असलेली कामे मुदतीत पूर्ण करावी-पर्यटन मंत्री मा.ना.शंभूराज देसाई 

महाबळेश्वर : महापर्यटन उत्सव महाबळेश्वर आयोजन २ ते ४ मे या कालावधीत करण्यात आले आहे. या अनुषंगाने सुरू असलेली कामे मुदतीत पूर्ण करावीत, असे निर्देश पर्यटन मंत्री मा.ना. शंभूराज देसाई साहेब यांनी दिले. 

पर्यटन मंत्री तथा सातारा जिल्हा पालकमंत्री मा.ना. शंभूराज देसाई साहेब यांनी महापर्यटन उत्सव महाबळेश्वरच्या अनुषंगाने महाबळेश्वर मध्ये सुरू असलेल्या कामांची व स्थळांची पाहणी केली. 

महापर्यटन उत्सव महाबळेश्वर अंतर्गत मधाचे गाव मांघर व पुस्तकांचे गाव भिलार या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पर्यटक जातील या दृष्टीने काम करावे. महापर्यटन उत्सव कालावधीत वाहतूक कोंडी होणार नाही याची दक्षता घ्यावी.महापर्यटन उत्सवामध्ये स्थानिकांचाही सहभाग घ्यावा अशा सूचना करून पालकमंत्री मा.ना.शंभूराज देसाई साहेब म्हणाले, सर्व विभागांनी स्थानिकांच्या मदतीने हा महोत्सव यशस्वी करावा. महाबळेश्वर मध्ये येणाऱ्या कोणत्याही पर्यटकाची गैरसोय होणार नाही याची दक्षता घ्यावी. या उत्सवाला जास्तीत जास्त पर्यटक कसे येतील हेही पाहावे. त्याचबरोबर विविध टीव्ही वाहिन्यांवरून महापर्यटन उत्सव महाबळेश्वराची प्रसिद्धी करावी, असे निर्देशही पालकमंत्री मा.ना.शंभूराज देसाई साहेब यांनी दिले.

याप्रसंगी प्रांताधिकारी राजेंद्र कचरे तहसीलदार तेजस्विनी पाटील, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी योगेश पाटील, सार्वजनिक बांधकाम विभागाची उपविभागीय अधिकारी अजय देशपांडे यांच्यासह तालुकास्तरीय विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

कुडाळ गटात भाजपच्या सौ जयश्रीताई गिरीचां प्रचाराचा झंझावात

कुडाळ गटात भाजपच्या सौ. जयश्रीताई गिरीचां प्रचाराचा झंझावात मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचा विश्वास सार्थ ठरवत विजयश्री खेचून आणणार सातारा:जावली तालुक्यात

Live Cricket