कुडाळ गटात भाजपच्या सौ जयश्रीताई गिरीचां प्रचाराचा झंझावात साताऱ्याच्या अस्मितेला सुरेल सलाम’आम्ही सातारी’ गीताचा मंगळवारी शाहू कलामंदिरात भव्य प्रकाशन सोहळा कोडोलीच्या सुपुत्राचा राष्ट्रीय स्तरावर गौरव; उस्मानाबादी शेळी संवर्धनासाठी ‘NBAGR’ कडून विशेष सन्मान  कुंभरोशी गणात ‘कमळ’ फुलणार? सामाजिक कार्याचा वारसा अन् दांडगा अनुभव असलेले सुरेश जाधव रिंगणात! गौरीशंकर सुखात्मे स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न विद्यार्थ्यांच्या कलाविष्काराचे रसिक प्रेक्षकांकडून झाले कौतुक  लढायचं परिवर्तनासाठी, लढायचं विकासासाठी! – श्री. सुभाष महादेव सोंडकर यांना भाजपची अधिकृत उमेदवारी
Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » उद्योगजगत » जगातील सर्वात महागडा कुत्रा खरेदी करणाऱ्या त्या व्यक्तीच्या घरावर ईडीचा छापा,

जगातील सर्वात महागडा कुत्रा खरेदी करणाऱ्या त्या व्यक्तीच्या घरावर ईडीचा छापा,

जगातील सर्वात महागडा कुत्रा खरेदी करणाऱ्या त्या व्यक्तीच्या घरावर ईडीचा छापा

बंगळुरू : कर्नाटकमधील बंगळुरू येथे राहणाऱ्या एस. सतीश यांनी काही दिवसांपूर्वी ५० कोटी रुपये मोजून वुल्फ डॉग अर्थात लांडग्यासारखा दिसणारा कुत्रा खरेदी केला. हा जगातला सर्वात महागडा कुत्रा असल्याचा एस. सतीश यांचा दावा आहे.फक्त कुत्रा खरेदी करण्यासाठी ५० कोटी रुपयांची व्यवस्था करणाऱ्या एस. सतीश यांच्या उत्पन्नाचे स्रोत काय असा प्रश्न नेटकरी विचारत आहेत. नेटकऱ्यांप्रमाणेच ईडी अधिकाऱ्यांनाही हा प्रश्न सतावत आहे. ईडीच्या पथकाने एस. सतीश यांच्या आर्थिक व्यवहारांची चौकशी सुरू केली आहे. सतीशने ईडीला स्वतःहून ज्या बँक खात्याची माहिती दिली त्या खात्यातून ५० कोटी रुपयांचा व्यवहार झाल्याचे दिसत नाही. यामुळे कुत्र्याच्या खरेदीसाठी हवालामार्फत आर्थिक व्यवहार झाला आहे का ? याची चौकशी ईडीने सुरू केली आहे.

एस. सतीश या ५१ वर्षीय व्यक्तीने फेब्रुवारी २०२५ मध्ये एका दलालामार्फत वुल्फ डॉग अर्थात लांडग्यासारखा दिसणारा कुत्रा खरेदी केला. जगातील सर्वात दुर्मिळ म्हणून ओळखला जाणारा कॅडाबॉम्ब ओकामी प्रजातीचा हा कुत्रा फक्त आठ महिन्यांचा आहे. त्याचे वजन ७५ किलो आहे आणि उंची ३० इंच आहे. हा कुत्रा खरेदी करण्यासाठी ५० कोटी रुपये मोजल्याचे एस. सतीश यांनी सांगितले.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

कुडाळ गटात भाजपच्या सौ जयश्रीताई गिरीचां प्रचाराचा झंझावात

कुडाळ गटात भाजपच्या सौ. जयश्रीताई गिरीचां प्रचाराचा झंझावात मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचा विश्वास सार्थ ठरवत विजयश्री खेचून आणणार सातारा:जावली तालुक्यात

Live Cricket