रणजीत कासलेला बीड पोलिसांनी घेतलं ताब्यात
पुणे -निलंबित पोलीस अधिकारी रणजित कासलेला बीड पोलिसांनी पहाटे ताब्यात घेतलं आहे. पुण्यातील स्वारगेट परिसरातील हॉटेलमधून आज पहाटे बीड पोलिसांनी कासलेला ताब्यात घेतलं आहे.
काल रणजित कासले दिल्लीवरून पुण्यात आल्यानंतर स्वारगेट परिसरातील एका हॉटेलमध्ये मुक्कामी होता. आज कासले पोलिसांना शरण येणार होता. बीड प्रकरणात रणजीत कासले याने गंभीर आरोप केले आहेत.
रणजीत कासले पोलिसांना शरण येणार असल्याचे त्याने सोशल मीडियावर व्हिडिओ पोस्ट करत सांगितले होते. रणजित कासले काल पुणे विमानतळावर दाखल झाले. यावेळी त्याने माध्यमांशी संवाद साधला. कासले याने अनेक गोष्टींवर तेव्हा भाष्य केले. वाल्मिक कराडच्या एन्काऊंटरपासून ते विधानसभा निवडणुकीकरता मतदान केंद्रावरील त्याच्या कामाशिवयी त्याने सर्व खुलासा केला. माझ्याकडे पुरावे असून मी सर्व गोष्टी उघड करण्यासाठी आलो असल्याचे रणजित कासले म्हणाला.
