Home » राज्य » प्रशासकीय » घरकुल प्रकरणी ग्रामसेविकेसह दोषींवर कठोर कारवाई करा-आमदार मनोज घोरपडे वडोली निळेश्वर येथील धरणे आंदोलनाला स्थगिती.

घरकुल प्रकरणी ग्रामसेविकेसह दोषींवर कठोर कारवाई करा-आमदार मनोज घोरपडे  वडोली निळेश्वर येथील धरणे आंदोलनाला स्थगिती.

घरकुल प्रकरणी ग्रामसेविकेसह दोषींवर कठोर कारवाई करा-आमदार मनोज घोरपडे  वडोली निळेश्वर येथील धरणे आंदोलनाला स्थगिती.

कोपर्डे हवेली, ता. १७ : ता. कराड येथील ग्रामपंचायत वडोली निळेश्वर यांच्या मनमानी कारभारा विरुद्ध व ग्रामसेविका पुष्पा कोळी यांच्यावरील कारवाईसाठी सुरु असलेले धरणे आंदोलन विद्यमान आमदार मनोज घोरपडे यांच्या पुढाकाराने सोडवण्यात आले. वडोली निळेश्वर ग्रामसेविका पुष्पा कोळी यांच्या मनमानी कारभाराच्या विरोधात गावातील अविनाश डुबल, अक्षय डुबल, हणमंत पवार व त्यांच्या सहकाऱ्यांनी शांततेच्या मार्गाने बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले होते. गावातील बोगस ग्रामसभेच्या ठरावाने अपात्र केलेल्या लाभार्थ्यांची घरकुले पात्र करून मंजुरी मिळावी किंवा ग्रामसेविका पुष्पा कोळी यांच्याकडून घरकुलांची रक्कम वसूल करून द्यावी, ग्रामसेविकेवर कठोर कारवाई करणे, ग्रामपंचायत कार्यालयामध्ये सीसीटीव्ही बसवणे या प्रमुख मागण्यासाठी आंदोलन मागच्या तीन दिवसांपासून चालू केले होते. 

          या आंदोलनास कराड उत्तरचे विद्यमान आमदार मनोज घोरपडे यांनी समक्ष भेट देऊन संबंधितांवर कडक कारवाईचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलकांनी आंदोलन स्थागित केले. यावेळी ग्रामस्थांच्या मागणीनुसार ग्रामपंचायतीचे दप्तर सील करण्याची सुचना आमदार घोरपडे यांनी गटविकास अधिकारी यांना केली त्यानुसार लगेचच ग्रामपंचायतीचे दप्तर सील करण्यात आले.

       यावेळी बोलताना आमदार मनोज घोरपडे म्हणाले, गावातील ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक यांचे कामकाज हे थेट शासनाच्या मूल्यमापनावर परिणाम करत असतात. त्यामुळे ग्रामसेवकांनी कामांमध्ये हलगर्जीपणा करू नये. तसेच कोणाच्याही राजकीय दबावाला बळी न पडता आपले काम प्रमाणिकपणे पार पाडावे. यामध्ये इथून पुढे चुकीचे काही जाणवल्यास निश्चितच त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल.

           यावेळी माजी उपसरपंच दयानंद पवार, अमोल पवार, महेश चव्हाण, मोहन चव्हाण, कृष्णत चव्हाण, निलेश पवार, हनुमंत पवार, अविनाश डुबल, अक्षय डुबल, प्रजल पवार, गणेश पवार, अक्षय पवार, सुहास पवार, वैभव माने, सुरेश पाटील, अक्षय वाघमारे व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

कोट : 

वडोली निळेश्वर येथील घरकुल अपात्र प्रकरण खुपचं गंभीर असून याप्रकरणी अधिकाऱ्यांनी प्रशासकीय कामामध्ये पारदर्शकता ठेवून सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करावा. अधिकाऱ्यांनी योग्य कारवाई केली नाही तर येत्या पावसाळी अधिवेशनात वडोली निळेश्वर ग्रामस्थांचे प्रश्न विधान सभेत मांडणार.

– विद्यामन आमदार मनोज घोरपडे.

शासकीय कामात अनियमितता आढळल्याने यापूर्वीच ग्रामसेविका पुष्पा कोळी यांची वेतनवाढ रोखली आहे. आठ ते दहा दिवसांत चौकशी पूर्ण करून यामध्ये दोषी आढळणाऱ्या सर्वांवर कार्यवाही केली जाईल. आज ग्रामपंचायत मध्ये उपलब्ध असलेले दप्तर सील करुन सखोल दप्तर तपासणी केली जाईल. तपासणीत काही कागदपत्र गहाळ असल्यास ती देखील कार्यवाही केली जाईल.

– प्रताप पाटील गटविकास अधिकारी पंचायत समिती कराड.

घरकुल योजनेतील अपात्र केलेल्या लाभार्थ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आमदार मनोज घोरपडे यांनी जिल्हापरिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांना थेट संपर्क साधला व अपात्र घरकुल प्रकरण कशाप्रकारे हाताळता येईल व लाभार्थ्यांना घरकुल योजनेचा लाभ मिळवून देण्याबाबत चर्चा केली.

वडोली निळेश्वर ता. कराड येथील अपात्र घरकुल प्रकरणात आंदोलन स्थळी विद्यमान आमदार मनोज घोरपडे यांनी भेट दिली. यावेळी ग्रामस्थांनी ग्रामसेविका पुष्पा कोळी यांच्या मनमानी कारभारासह बंद अवस्थेतील सी सी टी व्ही यंत्रणा, पाणीपुरवठा योजना, रस्ते, गटर सारख्या समस्यांचा पाढा आ. मनोज घोरपडे यांच्यासमोर वाचला. यावेळी ग्रामस्थांच्या भावना तीव्र होत्या.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

ठाकरे बंधू एकत्र येणार?

Post Views: 82  ठाकरे बंधू  एकत्र येणार   राज ठाकरे यांनी दिलखुलास भाष्य केलं आहे. ते महेश मांजरेकर यांनी घेतलेल्या मुलाखतीत

Live Cricket