वंडर विमेन प्रीमियर लीगमध्ये टीम पँथर विजेती
पॉवर पँथर टीम उपविजेती ; स्पर्धेला सातारकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
सातारा – येथील वंडर विमेन क्लब (डब्ल्यूडब्ल्यूसी)तर्फे वंडर विमेन प्रीमियर लीग (डब्ल्यूडब्ल्यूपीएल)चे आयोजन दि. ११ ते १३ एप्रिल दरम्यान जिल्हयात प्रथमच करण्यात आले होते. या स्पर्धेतील सर्व सामने शाहूपुरीतील अर्कशाळानगर येथील ॲस्ट्रोपॉड टर्फवर झाले. या स्पर्धेला सातारकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. डब्ल्यूडब्ल्यूपीएलच्या पहिल्या सिझनमध्ये टीम पॅंथर विजेती ठरली तर पॉवर पॅंथर टीम उपविजेती ठरली.
वंडर विमेन क्लबच्या वतीने प्रथमच महिलांसाठी स्पर्धा भरण्यात आली होती. या स्पर्धेतून मैत्रीपूर्ण स्पर्धेची भावना निर्माण करणे आणि खेळांमध्ये महिलांची भूमिका अधोरेखित करणे, हा हेतू होता. या स्पर्धेमध्ये एकूण बारा संघ सहभागी झाले होते. प्रत्येक संघात दहा खेळाडू होते तर प्रत्येक सामना सहा षटकाचा झाला.
या स्पर्धेत लाईनेस स्ट्रायकर्स, राजधानी सातारा, हीलिंग वॉरियर्स, गर्ल्स पॉवर, गुलाब गँग, झुलेलाल 11 , लक्ष्मी सुपर क्वीन, स्फूर्ती सुपर विमेन, पीएनव्हीएम सुपरक्वीन्स, पॉवर पँथर्स, स्फूर्ती वॉरियर्स आणि टीम पँथर असे बारा संघ सहभागी झाले होते. महिला प्रेक्षकांसाठी हे सामने मोफत होते. संपूर्ण स्पर्धा अत्यंत उत्साहात, जल्लोषात आणि स्पर्धात्मक वातावरणात झाली. स्पर्धा यशस्वी होण्यासाठी वंडर विमेन क्लबच्या सदस्यांनी परिश्रम घेतले. या स्पर्धेला खेळाडू, प्रेक्षक, स्पॉन्सर्स या सगळ्यांचा चांगला प्रतिसाद मिळाला. स्पर्धा यशस्वी होण्यासाठी आयोजक टीम, त्यांचे कुटुंबिय, प्रायोजक, स्वयंसेवक, मैत्रिणी आणि महिला क्लब सदस्यांनी मदत केली.
या स्पर्धेत टीम पँथर विजेती ठरली तर पॉवर पॅथर टीम उपविजेती ठरली. सीजन विजेता संघाला ट्रॉफी, मेडल्स, जे.के.देवी ज्वेलर्सच्यावतीने चांदीचे नाणे, उपविजेता संघाला ट्रॉफी,मेडल्स, गिफ्ट हॅपर्स, अंतिम सामन्यातील सर्वोत्कृष्ट खेळाडू, स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट महिला खेळाडू, सर्वोत्कृष्ट फलंदाज, सर्वोत्कृष्ट गोलंदाज अशी बक्षिसे देण्यात आली. तसेच सहभागी प्रत्येक खेळाडूला मेडल्स देण्यात आली. यावर्षी मिळालेला प्रतिसाद पाहून दरवर्षी ही स्पर्धा आणखी मोठ्या स्वरुपात आयोजित केली जाणार आहे. स्पर्धेसाठी स्मार्टअस ॲबॅकस, बालाजी मोबाईल, मीम कॉम्प्युटर्स, शू बॉक्स, निशांत डान्स ॲकॅडमी, जे.के. देवी ज्वेलर्स, राईट स्पॉट, हेल्पिंग एंजल्स, ग्लोबल ट्रेडर्स, इलाईट हॉटेल, बेकीज, चकोर बेकरी, विश्वेश्वर सहकारी बँक, रुप दर्शन, आर्च स्टुडियो, बालाजी अलॉइन्स, आर्ट व्हिला, ॲस्ट्रोपॉड, प्रमिला इन्फोसॉफ्ट, होलसम बॉईल्स यांनी प्रायोजक्तव दिले होते. तर स्पर्धेचे संयोजक टीममध्ये अभिलाषा दळवी, डॉ. सुरभी वाखरिया, श्रुती चव्हाण, पायल शहा, वृषाली भंडारी, तृप्ती भोईटे, ऐश्वर्या पाटील, गौरी गुरव, तन्वी मोरे, राणी मुथा, भाग्यश्री लाहोटी, सुरभी लुणावत यांचा समावेश होता.
