गौरीशंकर लिंब मध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात संपन्न
लिंब -भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती गौरीशंकर इन्स्टिट्यूट ऑफ फार्मासिटिकल्स एज्युकेशन अँड रिसर्च लिंब महाविद्यालय मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी संस्थेचे जनसंपर्क अधिकारी श्रीरंग काटेकर यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर योगेश गुरव डॉक्टर संतोष बेल्हेकर डॉक्टर धैर्यशील घाडगे डॉक्टर भूषण पवार प्रा माधुरी मोहिते प्रा नीलम पवार प्रा रोहन खुटाळे प्रा दुधेश्यर क्षीरसागर प्रा शुभम चव्हाण रजिस्टर निलेश पाटील आदी प्रमुख उपस्थित होते यावेळी बोलताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर योगेश गुरव म्हणाले की महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या वैचारिकतेचा वारसा जतन करण्याची आजच्या काळाची खरी गरज आहे राष्ट्राच्या सर्वांगीण प्रगतीच्या दृष्टीने मोलाचे कार्य करणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सामाजिक समतेचा मंत्र देऊन देशाला नवी दिशा दिली आहे यावेळी विद्यार्थ्यांनीही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन कार्यावर आधारित विविध कार्यक्रमाचे आयोजन महाविद्यालयामध्ये करण्यात आले होते प्रास्ताविक व आभार संजय देशमाने यांनी केले.
