इस्रो शिबिरासाठी संचिता शिंदेची निवड
पिंपोडे बुद्रुक : देऊर (ता. कोरेगाव) येथील श्री मुधाईदेवी विद्यामंदिरमधील विद्यार्थिनी संचिता उमेश शिंदे (रा. आसनगाव) हिची भारतीय अंतराळ संशोधन संस्थाच्या (इस्रो) युविका २०२५ कार्यक्रमासाठी निवड झाली.
शालेय विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन संशोधनवृत्ती वाढीस लागावी, या उद्देशाने इस्त्रोच्या वतीने इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यांसाठी ‘यंग सायंटिस्ट प्रोग्राम’ (युविका २०२५) परीक्षा घेण्यात आली होती. यामध्ये संचित शिंदे हिचा देशात २७२ व महाराष्ट्रात मुलींमध्ये तिसरा क्रमांक मिळवला आहे. महाराष्ट्रातून १४ विद्यार्थ्यांची अहमदाबाद, गुजरात येथे १५ दिवसांचे शिबिर होणार आहे. त्यासाठी तिची निवड झाली आहे. तिला मुख्याध्यापक प्रदीप ढाणे, शिक्षक विश्वास गुरव, संगिता जाधव, तृप्ती वडगावे, शैलजा खुडे यांनी मार्गदर्शन केले. तिच्या यशाबद्दल संस्था चेअरमन हणमंतराव कदम, सचिव राजेंद्र कदम, शालेय समिती अध्यक्ष देवेंद्र कदम, विज्ञान सल्लागार समितीचे अध्यक्ष राजाराम कदम, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा शर्मिला पवार, माता पालक संघाच्या अध्यक्षा सीमा कदम, पालक संघ अध्यक्ष श्रीकांत कदम , प्राचार्य प्रदिप ढाणे, पर्यवेक्षक ज्ञानेश्वर देशमुख, शिक्षक प्रतिनिधी मनेश धुमाळ यांनी अभिनंदन केले.
