Home » देश » 10 आणि 500 रुपयांच्या नवीन नोटा चलनात येणार, RBI ची घोषणा

10 आणि 500 रुपयांच्या नवीन नोटा चलनात येणार, RBI ची घोषणा

10 आणि 500 रुपयांच्या नवीन नोटा चलनात येणार, RBI ची घोषणा

चलणात लवकरच नवीन 10 आणि 500 रुपयांच्या नोटा येणार असल्याची माहिती देशाची सर्वात मोठी बॅंक आरबीआयने (RBI) दिली आहे. आरबीआयने दिलेल्या माहितीनुसार, चलनात लवकरच महात्मा गांधी (नवीन) मालिकेतील 10 आणि 500 मूल्याच्या नोटा जारी करण्यात येणार आहे. या नोटांवर विद्यमान गव्हर्नर संजय मल्होत्रा ​ यांची स्वाक्षरी असणार आहे.

याबाबत माहिती देताना आरबीआयने एका निवेदनात म्हटले आहे की, या नवीन नोटांची रचना महात्मा गांधी (नवीन) मालिकेतील आधीच जारी केलेल्या 10 आणि 500 च्या नोटांसारखी असेल. त्यामुळे त्यांच्या डिझाइनमध्ये किंवा सुरक्षा वैशिष्ट्यांमध्ये कोणताही बदल होणार नाही. या नोटांमध्ये बदल म्हणून फक्त विद्यमान गव्हर्नर संजय मल्होत्रा ​​यांची स्वाक्षरी असणार आहे. तर दुसरीकडे आरबीआयने स्पष्ट केले आहे की यापूर्वी जारी केलेल्या सर्व 10 आणि 500 च्या नोटा कायदेशीर चलन म्हणून कायम राहतील. याचा अर्थ असा की जुन्या नोटा चलनात राहतील त्यामुळे सामान्य जनतेला कोणतीही काळजी करण्याची गरज नाही.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

सातारा जिल्हा बॉक्सिंग स्पर्धेत श्रीपतराव पाटील हायस्कूलला सुवर्ण झळाळी

Post Views: 60 सातारा जिल्हा बॉक्सिंग स्पर्धेत श्रीपतराव पाटील हायस्कूलला सुवर्ण झळाळी सातारा:करंजे पेठ येथील शिक्षण प्रसारक संस्था संचलित श्रीपतराव

Live Cricket