नायगावात रंगणार भक्तीचा जागर; ज्ञानेश्वरी पारायण व अखंड हरिनाम सप्ताहाला उद्यापासून प्रारंभ शेखर गोरे १ सप्टेंबरला शिवसेनेत प्रवेश करणार; माण-खटावच्या राजकारणात नवे समीकरण राष्ट्रीय महामार्गावर विदेशी दारूची अवैद्य वाहतुक करणारे दोन जण ताब्यात ६ लाख १९ हजारांचा मुद्देमाल जप्त खंडाळा पोलीस स्टेशनची धडाकेबाज कारवाई महाबळेश्वर: एम. ई. एस. इंग्लिश मीडियम हायस्कूलच्या विद्यार्थिनींनी नगराध्यक्ष सुनील शिंदे यांना बांधली राखी; रक्षाबंधन सोहळा उत्साहात संपन्न केळघर बाजारपेठेत झेब्रा क्रॉसिंग, स्पीड ब्रेकर बसवा; अन्यथा आंदोलनाचा इशारा महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाची प्रशासनाकडे मागणी; नागरिकांच्या सुरक्षेसाठी तातडीने उपाययोजना करण्याचे आवाहन जि. प. सदस्या कविता ओंबळे यांची मागणी; जावळीतील शासकीय कार्यालयांत बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो लावण्याचे आवाहन
Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » ज्ञानशीला प्ले स्कूल हे संस्काराचे ज्ञान केंद्र आहे – विलासराव पाटील

ज्ञानशीला प्ले स्कूल हे संस्काराचे ज्ञान केंद्र आहे – विलासराव पाटील 

ज्ञानशीला प्ले स्कूल हे संस्काराचे ज्ञान केंद्र आहे – विलासराव पाटील 

 ज्ञानशीला प्ले स्कूल म्हणजे संस्काराचे ज्ञान केंद्र आहे, असे प्रतिपादन रोटरी शिक्षण संस्था मलकापूरचे प्रमुख विलासराव पाटील पोतलेकर यांनी केले. ते ज्ञानशीला प्ले स्कूलच्या वार्षिक पारितोषिक वितरण समारंभात बोलत होते.

यावेळी क्रीडा प्रशिक्षक अर्जुन कळंबे, पांडुरंग कदम, लक्ष्मण कणसे, संतोष मोरे, स्कूल प्रमुख वैशाली मोरे, स्नेहल पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. ते पुढे म्हणाले, या शाळेत ३ वर्षे वयोगटासाठी ‘नर्सरी’, ४ वर्षे वयोगटासाठी ‘ज्युनिअर केजी’ आणि ५ वर्षे वयोगटासाठी ‘सिनिअर केजी’ असे वर्ग असून, गुणवंत व तज्ज्ञ शिक्षकांमार्फत शालेय तसेच सहशालेय उपक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना जीवनकौशल्याचे शिक्षण दिले जाते. विशेष म्हणजे येथे विद्यार्थ्यांना फक्त शिक्षणाचे धडेच नाही तर सर्वगुण संपन्न व्यक्ती घडविण्याचे कार्यही केले जाते. त्यामुळेच तांबवे व सुपने परिसरातील १५ गावांतील विद्यार्थी येथे शिक्षण घेत आहेत.

अर्जुन कळंबे म्हणाले येथे विद्यार्थी दाखल झाल्यास तो जगाच्या कोणत्याही स्पर्धेत टिकण्याची शाश्वत हमी दिली जाते. त्यामुळे आपल्या पाल्याला संस्कारक्षम आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी ज्ञानशीला प्ले स्कूल ला पालकांचा प्रतिसाद मिळत आहे.लक्ष्मण कणसे, स्नेहल पाटील तसेच पालक प्रतिनिधींनीही आपली मनोगते व्यक्त केली.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक स्कूल प्रमुख वैशाली मोरे यांनी केले, तर आभार प्रदर्शन पल्लवी पाटील यांनी व्यक्त केले. या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने पालक उपस्थित होते.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

नायगावात रंगणार भक्तीचा जागर; ज्ञानेश्वरी पारायण व अखंड हरिनाम सप्ताहाला उद्यापासून प्रारंभ

नायगाव येथे उद्यापासून ज्ञानेश्वरी सामुदायिक पारायण सोहळा केळघर/प्रतिनिधी : कोरेगाव तालुक्यातील नायगाव येथे श्री ज्ञानेश्वरी सामुदायिक पारायण सोहळा व अखंड

केळघर बाजारपेठेत झेब्रा क्रॉसिंग, स्पीड ब्रेकर बसवा; अन्यथा आंदोलनाचा इशारा महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाची प्रशासनाकडे मागणी; नागरिकांच्या सुरक्षेसाठी तातडीने उपाययोजना करण्याचे आवाहन

Live Cricket