यशोदा इन्स्टिट्यूटच्या बी फार्मसी च्या उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम. निकालात मुली अव्वल
यशोदा शिक्षण प्रसारक मंडळ संचालित यशोदा कॉलेज ऑफ फार्मसी ने उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम राखली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ लोणेरे यांच्या मार्फत घेण्यात आलेल्या बी फार्मसी या पदवी अभ्यासक्रमाच्या द्वितीय वर्षाच्या(सत्र ३) परीक्षांमध्ये यशोदा कॉलेज ऑफ फार्मसी च्या विद्यार्थ्यांनी उज्वल यश संपादन केले.
अनुजा चव्हाण (SGPA-8.67), योगिता बनकर (SGPA-8.42) शिवानी इंगवले (SGPA-8.33) या विद्यार्थिनींनी महाविद्यालयांमध्ये अनुक्रमे प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक पटकावला. महाविद्यालयांमध्ये असणाऱ्या सर्व सुविधायुक्त प्रयोगशाळा विद्याभूषित आणि अनुभवी शिक्षक वर्ग, सुसज्ज ग्रंथालय, संगणक विभाग तसेच वेळोवेळी मिळणारे संस्थापक अध्यक्ष प्रा. दशरथ सगरे , उपाध्यक्ष प्रा.अजिंक्य सगरे यांच्या मार्गदर्शनामुळे निकालातील सातत्य आले. असे यशोदा कॉलेज ऑफ फार्मसी चे प्राचार्य डॉ. विठ्ठल चावरे यांनी यावेळी सांगितले.
बी फार्मसी विभागाच्या यशाबद्दल सर्व यशस्वितांचे संस्थापक अध्यक्ष प्रा.. दशरथ सगरे , उपाध्यक्ष प्रा.. अजिंक्य सगरे, प्राचार्य डॉ. चवरे, यांनी शिक्षक आणि विद्यार्थी वर्गाचे अभिनंदन केले तसेच भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
