मानसी घोष बनली ‘इंडियन आयडल १५’ ची विनर भाजपा एक परिवार, भाजपा कार्यकर्त्यांचा पक्ष: नामदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले सह्याद्री साखर कारखाना निवडणूक निकाल माजी आमदार बाळासाहेब पाटील यांच्या नेतृत्वात पी डी पाटील पॅनेलचा सुमारे ८००० मताधिक्याने विजय. जेथे धर्म, तेथे विजय आणि जेथे राम, तेथे सत्य!इतिहासाच्या प्रत्येक वळणावर आपली वेगळी ओळख निर्माण करणारा बंजारा समाज सुरेश वाडकर यांनी आपल्या वडिलांच्या स्मृती चिरंतन ठेवण्याचा प्रयत्न केला असून त्यांचे हे उपक्रम प्रेरणादायी आहेत-ज्ञानदेव रांजणे महाबळेश्वर तालुक्यात तिसरी आणि सहावीच्या विद्यार्थ्यांसाठी तालुकास्तरीय प्रज्ञाशोध परीक्षा उत्साहात संपन्न
Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » येरणे केंद्राचा बाल आनंद मेळावा वेंगळे येथे उत्साहात संपन्न

येरणे केंद्राचा बाल आनंद मेळावा वेंगळे येथे उत्साहात संपन्न

येरणे केंद्राचा बाल आनंद मेळावा वेंगळे येथे उत्साहात संपन्न

महाबळेश्वर प्रतिनिधी – महाबळेश्वर तालुक्यातील दुर्गम भागातील सोळशी नदीच्या खोऱ्यातील येरणे केंद्रातील १२ प्राथमिक शाळांचा एकत्रित बाल आनंद मेळावा वेगळे वरचीवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत उत्साहात पार पडला.

विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा, विविध स्पर्धांमध्ये विजेत्या विद्यार्थ्यांचा गौरव व्हावा, तसेच शिक्षक, पालक, विद्यार्थी आणि समाज यांचा एकत्रित संवाद व्हावा, या उद्देशाने या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. माजी सभापती संजय गायकवाड, गटशिक्षणाधिकारी आनंद पळसे, विस्तार अधिकारी नामदेव धनावडे, वैद्यकीय अधिकारी डॉ. अमोल कदम, केंद्रप्रमुख आनंद संकपाळ, चंद्रकांत जंगम, शिक्षक सहकारी बँकेचे संचालक संजय संकपाळ, जयराज जाधव, अरुण कदम, सरपंच शोभा संकपाळ, माजी सरपंच रमेश संकपाळ, गणपत संकपाळ, वैशाली संकपाळ, ग्रामपंचायत वेगळेचे आजी-माजी सदस्य आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

विद्यार्थ्यांची भाषणे, सांस्कृतिक कार्यक्रम, मनोरंजनात्मक खेळ, आरोग्यविषयक व्याख्यान, स्नेहभोजन आणि खाऊवाटप असे विविध उपक्रम या मेळाव्यात आयोजित करण्यात आले होते. ग्रामीण भागातील जिल्हा परिषदेतील मुले प्रत्येक क्षेत्रात आघाडीवर राहावीत, यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करू, असे माजी सभापती संजय गायकवाड यांनी सांगितले. येरणे केंद्रातील शिक्षक शैक्षणिक गुणवत्ता वाढवण्यासाठी उत्तम काम करत असून, तालुक्यात शैक्षणिक गुणवत्ता वाढवण्यात त्यांचे मोलाचे योगदान आहे, असे गटशिक्षणाधिकारी आनंद पळसे यांनी सांगितले. तसेच त्यांनी सुरेख रांगोळी, नियोजनबद्ध कार्यक्रम आणि उत्कृष्ट नियोजनाबद्दल शिक्षकांचे कौतुक केले.केंद्रातील सर्व शिक्षकांच्या उत्तम सहकार्याने हा बाल आनंद मेळावा विद्यार्थी, पालक, शिक्षक आणि समाज यांच्यासाठी आनंददायी ठरला.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

Live Cricket