Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खंडाळा येथे नवीन शैक्षणिक वर्षाचे इयत्ता पहिलीसाठी प्रवेश सुरू

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खंडाळा येथे नवीन शैक्षणिक वर्षाचे इयत्ता पहिलीसाठी प्रवेश सुरू

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खंडाळा येथे नवीन शैक्षणिक वर्षाचे इयत्ता पहिलीसाठी प्रवेश सुरू

वाई प्रतिनिधी (शुभम कोदे)खंडाळा येथील जिल्हा परिषद आदर्श प्राथमिक केंद्र शाळा खंडाळा येथे नवीन शैक्षणिक वर्षातील इयत्ता पहिलीचे प्रवेश सुरू झाले आहेत. नवीन शैक्षणिक वर्षापासून शासनाच्या धोरणानुसार सीबीएसई पॅटर्न इयत्ता पहिली साठी सुरू होणार असून शासनाच्या पीएम श्री आणि आदर्श शाळा या उपक्रमात शाळेची निवड झाली असलेने पहिलीच्या प्रवेशासाठी शाळेत लगबग सुरू झाली आहे.

अनुभवी शिक्षक वर्ग, मोफत पाठ्यपुस्तके, मोफत गणवेश, संगीतमय परिपाठ, यशवंत प्रयोगशाळा, खगोलीय प्रयोगशाळा, आदर्श परसबाग, भरपूर क्रीडा साहित्य, ई लर्निंग सुविधा, मध्यान भोजन योजना, उपस्थिती भत्ता योजना, सुवर्ण महोत्सव शिष्यवृत्ती, तसेच स्पर्धा परीक्षांचे मार्गदर्शन, भव्य आणि दिमाखदार स्नेहसंमेलन, राष्ट्रीय दर्जाच्या व्याख्यानमाला, आरोग्य शिबिरे विविध योजना आणि वैशिष्ट्यांनी युक्त असलेली शाळा मागील काही वर्षांपासून नावारूपास आलेली शाळा आहे. या शैक्षणिक वर्षात परिसरातील पालकांनी इयत्ता पहिलीसाठीचा आपला प्रवेश लवकरात लवकर निश्चित करावा असे आवाहन मुख्याध्यापिका भोसले मॅडम आणि अध्यक्ष आश्लेषा गाढवे, शालेय व्यवस्थापन समिती आणि शिक्षक वर्ग यांनी केली आहे.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

नमो पर्यटन सुविधा केंद्राच्या उभारणीसाठी जागा निश्चित करा-पालकमंत्री शंभूराज देसाई

Post Views: 12 नमो पर्यटन सुविधा केंद्राच्या उभारणीसाठी जागा निश्चित करा-पालकमंत्री शंभूराज देसाई सातारा  : प्रतापगड किल्ल्याच्या परिसरातील दर्शनी भागात

Live Cricket