मांढरदेव येथे अवैद्य दारू विक्री बंदीचा महिलांचा निर्धार
महाराष्ट्र व महाराष्ट्र बाहेरील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असणाऱ्या मांढरदेव येथे राजरोसपणे चालू असलेली अवैध दारू विक्री बंद करण्यासाठी महिलांनी कंबर कसलेली आहे दारू विक्री बंद करण्यासाठी महिलांनी बैठक घेऊन दारूबंदीचा निर्धार केलाआहे.
महाराष्ट्र व महाराष्ट्र बाहेरील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असणाऱ्या श्री काळुबाईच्या दर्शनासाठी येथे अनेक भाविक मांढरदेव येथे येत असतात, नवसाला पावणारी काळुबाई अशी देवीची ख्याती आहे त्यामुळे मंगळवार, शुक्रवार,अमावस्या,पौर्णिमा येथे भाविक गर्दी करतात, बकरी कोंबडी कापून त्यांचा नैवेद्य देवीच्या शिपायांना दाखवण्याची परंपरा आहे, मटन आले की मद्यपान हे आलेच त्यामुळे गावामध्ये अवैद्य रित्या मध्यविक्री मोठ्या प्रमाणात चालू असते. देवीच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांना व गावातील ग्रामस्थ व तरुणांना देखील मोठ्या प्रमाणात मध्य विक्री केली जाते. यात अनेक तरुण व्यसनाधीन होताना दिसत आहेत तर अनेकांचे संसार उध्वस्त झाले आहेत यामुळेच गावातील महिलांनी एकत्र येऊन दारूबंदी करून अवैधरित्या दारू व्यवसाय करणाऱ्यांना धडा शिकवण्याचे ठरवले आहे यासाठी मांढरदेव गावात महिलांची बैठक घेऊन त्यामध्ये दारूबंदीचा निर्धार करण्यात आला या बैठकीला गावच्या सरपंच सीमा मांढरे,पोलीस पाटील जयश्री मांढरे व मोठ्या प्रमाणात महिला उपस्थित होत्या.
