Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » उद्योगजगत » राज्यातील शासकीय आय.टी.आय मध्ये आता डिजिटल लायब्ररीचे युग- श्रीरंग काटेकर

राज्यातील शासकीय आय.टी.आय मध्ये आता डिजिटल लायब्ररीचे युग- श्रीरंग काटेकर 

राज्यातील शासकीय आय.टी.आय मध्ये आता डिजिटल लायब्ररीचे युग- श्रीरंग काटेकर 

राज्यातील 417 आय.टी.आय डिजिटल लायब्ररी ने होणार सुसज्ज, राज्यसरकारचा निर्णय

सातारा -21व्या शतकात हायटेक एज्युकेशन काळाची गरज बनली आहे जागतिक स्पर्धेच्या युगात विज्ञान तंत्रज्ञान क्षेत्र आता अधिक गतिमान व विकसित झाल्याने हे ज्ञान अवगत करणे आवश्यक बनले आहे विशेषता कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) बरोबरच डिजिटल तंत्रज्ञान हे प्रत्येकाच्या जीवनशैलीचा एक अविभाज्य भाग झाला आहे राज्य सरकारने काळाची पाऊले ओळखून संपूर्ण राज्यातील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये (आय.टी.आय )शैक्षणिक वर्ष सन २०२५ -२६ पासून डिजिटल लायब्ररी ही संकल्पना राबवीत आहेत याविषयी गौरीशंकरचे जनसंपर्क अधिकारी श्रीरंग काटेकर यांचा विशेष लेख.

जागतिक स्तरावरील शिक्षण व्यवस्थेतील बदल पाहता भारतीय शिक्षण पद्धतीमध्ये ही अमुलाग्र बदल घडत आहे विशेषता पारंपारिक शिक्षणाच्या जागी आता आधुनिक शिक्षण प्रणालीने घेतली आहे त्यामुळे सर्व स्तरावर मोठ्या प्रमाणात बदल घडत आहे शिक्षणातून समाज घटक अधिक समृद्ध करताना तो कौशल्य बरोबरच विज्ञान तंत्रज्ञान विशेषतः डिजिटल तंत्रज्ञानाने अधिक विकसित झाले पाहिजे ही शासनाची भूमिका आहे त्या दृष्टीने राज्य सरकारने आता पुढाकार घेतला आहे राज्यातील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील एकूण 417 महाविद्यालयात शैक्षणिक वर्ष सन २०२५-२६ पासून आय.टी.आय शाखेतील विविध अभ्यासक्रमात शिकत असलेल्या विद्यार्थ्यांना आता आधुनिक ज्ञानाची कवाडे खुली करून दिली जात आहेत डिजिटल लायब्ररी सुविधा विद्यार्थ्यांना प्राप्त झाली पाहिजे ही शासनाची भूमिका आहे यासाठी कोट्यावधी रुपयाची आर्थिक निधीची तरतूद राज्याचे अर्थमंत्री नामदार अजितदादा पवार यांनी सन 2025 – 26 च्या अर्थसंकल्पात केली आहे राज्यातील आय.टी.आय मधील ग्रंथालय ही आधुनिक प्रगतीची ज्ञान केंद्र झाली पाहिजे हा नवा दृष्टिकोन राज्य सरकारने ठेवला आहे यामध्ये ग्रामीण व दुर्गम भागातील विद्यार्थी हा केंद्रबिंदू घटक ठेवून राज्यातील आय.टी.आय मध्ये हे धोरण राबविण्याचा राज्य सरकारचा संकल्प आहे आज संपूर्ण विश्व तंत्रज्ञान क्रांतीच्या दृष्टीने झेपावत असताना भारतीय शिक्षण प्रणाली ही कोणत्या क्षेत्रात मागे राहता कामा नये यासाठी शासनाची प्रयत्न सुरू आहेत यासाठी राज्य सरकारने काही ठोस व धोरणात्मक निर्णय घेताना पारंपारिक ग्रंथालयाच्या ठिकाणी डिजिटल ग्रंथालय सुसज्यरित्या अमंलात आणण्याचा निर्धार केला आहे यासाठी आवश्यक असणाऱ्या पायाभूत सोयी व सुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहेत यामुळे नजीकच्या काळात शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था आय.टी.आय मध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना चौफेर ज्ञानाची संधी उपलब्ध होणार आहे नजीकच्या काळात डिजिटल तंत्रज्ञाना शिवाय पर्याय नाही याची जाणीव राज्य सरकारला झाल्यामुळे राज्य सरकारने हे धोरण स्वीकारले आहे या सुविधे मुळे राज्यातील आय.टी.आय विद्यार्थ्यांना आता नव्या जगाची ओळख होणार आहे डिजिटल ग्रंथालयामुळे विद्यार्थ्यांना ई-बुक्स आणि इतर ऑनलाईन अभ्यासक्रमाचे साहित्यही आता या माध्यमातून लायब्ररीमध्ये उपलब्ध होणार आहे त्याचप्रमाणे एकाच वेळी असंख्य विद्यार्थ्यांना एकच संसाधनाचा वापर करता येणार असल्याने डिजिटल लायब्ररी आय.टी.आय विद्यार्थ्यांसाठी एक सुवर्णसंधी ठरणार आहे .

 राज्य सरकारने संत गाडगेबाबा शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था अमरावती व नेताजी सुभाषचंद्र बोस शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था मुंबई या दोन संस्थेमध्ये डिजिटल लायब्ररी अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी 99 लाखापेक्षा अधिक निधीची तरतूद केली आहे डिजिटल लायब्ररी ई बुक्स व्हिडिओ, ट्युटोरियल्स, ऑनलाइन कोर्स मटेरीयल, प्रॅक्टिकल, गाईङ्रस सुविधा आता विद्यार्थ्यांना प्राप्त होणार आहे .

               

                      श्रीरंग काटेकर

                  जनसंपर्क अधिकारी गौरीशंकर नॉलेज                                 सिटी लिंब सातारा  

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

यशोदा कॉलेज ऑफ फार्मसीमध्ये डॉ. कुबेर नागनाथ तर्कसबंद यांचे प्रेरणादायी अतिथी व्याख्यान

Post Views: 24 यशोदा कॉलेज ऑफ फार्मसीमध्ये डॉ. कुबेर नागनाथ तर्कसबंद यांचे प्रेरणादायी अतिथी व्याख्यान यशोदा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित,

Live Cricket