अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची मने सैनिकांसाठी विद्यार्थ्यांचा प्रेमाचा धागा; ५०० जवानांना राख्या अन् मिठाई मंजू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या फॅशन डिझाईनिंग व हॉटेल मॅनेजमेंट विभागाचा उपक्रम गणेशोत्सव मंडळांनी विहित परवानगीसाठी अर्ज सादर करण्याचे-सहायक धर्मादाय आयुक्तांचे आवाहन नेपाळ पूरग्रस्त भागात अडकलेल्या नागरिकांसाठी बीजिंग व काठमांडू भारतीय दूतावासाचे हेल्पलाइन क्रमांक जाहीर ऐतिहासिक प्रतापसिंह महाराज उद्यानाच्या विकासासाठी ५ कोटींचा निधी मंजूर परिक्षा केंद व परीसरात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 लागू
Home » Uncategorized » क्राईम डायरी » प्रेयसीकडून प्रियकराचा खून माणमधील घटना

प्रेयसीकडून प्रियकराचा खून माणमधील घटना 

प्रेयसीकडून प्रियकराचा खून माणमधील घटना 

दहिवडी : नरवणे (ता. माण) येथे अपघाताचा बनाव करून प्रेयसीने आईच्या मदतीने प्रियकराचा निर्घृण खून केला. खुनानंतर प्रियकराचा मृतदेह कारमध्ये ठेवून ती कार कालव्यात ढकलून दिल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी प्रेयसी, तिच्या आईसह सात जणांवर दहिवडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

योगेश सुरेश पवार गोंदवले बुद्रुक, ता. माणअसे खून झालेल्या व्यक्ती चे नाव आहे. तर रोशनी विठ्ठल माने व आई पार्वती विठ्ठल माने यांच्यासह सात जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, योगेश पवार याचा भाऊ तेजस याने मंगळवार (दि. 18) संध्याकाळपासून भाऊ योगेश गायब झाल्याची तक्रार दहिवडी पोलिस ठाण्यात दिली होती. त्यानंतर सपोनि दत्तात्रय दराडे यांनी त्याचा शोध सुरू केला होता. चारचाकी गाडीसह योगेश गायब झाल्याने व त्याचा फोन स्विच ऑफ झाल्याने घातपात झाल्याच्या संशयावरून तपासाची चक्रे गतीमान केली.

गुरुवार दि. 20 मार्च रोजी नातेपुतेजवळील फडतरवाडी हद्दीत पोलिसांना एक चारचाकी कालव्यामध्ये बुडालेल्या अवस्थेत दिसली. पोलिसांनी ही कार जेसीबीच्या सहाय्याने बाहेर काढली असता ती आतून लॉक होती. त्यामध्ये योगेश पवार याचा मृतदेह असल्याचेे आढळले. योगेशच्या मोबाईलवरील शेवटच्या कॉलवरुन त्यांनी संशयितांना मुंबई येथून ताब्यात घेतले. त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी अन्य साथीदारांच्या मदतीने योगेशचा खून केल्याची कबुली दिली. दहिवडी पोलिस या घटनेचा तपास करत आहेत.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची मने

अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची

Live Cricket