Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » साहित्यिक ग्रंथसंपदा » ४० वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर गुरुजी राजापुरे सेवानिवृत्त, पार्वतीपूर येथे होणार भव्य गौरव सोहळा.

४० वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर गुरुजी राजापुरे सेवानिवृत्त, पार्वतीपूर येथे होणार भव्य गौरव सोहळा.

४० वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर गुरुजी राजापुरे सेवानिवृत्त, पार्वतीपूर येथे होणार भव्य गौरव सोहळा.

पार्वतीपूर (महाबळेश्वर): जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कुमठे येथील वरिष्ठ मुख्याध्यापक श्री. शिवाजी रघुनाथ राजापुरे (गुरुजी) यांच्या ४० वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर ते आज सेवानिवृत्त झाले. त्यांच्या गौरवार्थ पार्वतीपूर येथे भव्य गौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.

श्री. राजापुरे यांनी जावली, बिरमणी, बिरवाडी, शिरवली, प्रतापगड, दूधगाव, नाकिंदा, कुमठे या शाळांमध्ये शिक्षकाची सेवा बजावली. या शाळांमधून त्यांनी अनेक विद्यार्थ्यांचे भविष्य घडवले. विविध स्पर्धा परीक्षा, क्रीडा स्पर्धा, विज्ञान प्रदर्शन, शिक्षण महोत्सव, सांस्कृतिक कार्यक्रम, विद्यार्थी व्यक्तिमत्व विकास स्पर्धा यांसारख्या उपक्रमांमध्ये त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तसेच केंद्र आणि तालुका स्तरावरील विविध उपक्रमांमध्ये त्यांनी मोलाचे योगदान दिले. हैदराबाद, दिल्ली, उदयपूर यांसारख्या ठिकाणी CCRT चे प्रशिक्षण घेऊन त्यांनी शिक्षकांमध्ये समृद्धता आणली.

ज्या शाळांमध्ये त्यांनी शिक्षक म्हणून सेवा केली, त्या शाळांना ISO शाळा, डिजिटल शाळा, तंबाखूमुक्त शाळा, स्वच्छ सुंदर उपक्रमशील आणि गुणवत्तापूर्ण शाळा असे विविध उपक्रम राबवून नावलौकिक मिळवून दिला. उत्तम प्रशासक, शिक्षण आणि विद्यार्थ्यांविषयी असलेली तळमळ, ग्रामस्थांशी असलेला उत्तम समन्वय, शैक्षणिक उठाव जमवण्यात असलेला हातखंडा, प्रशासनाशी असलेला समन्वय, सामाजिक आणि शैक्षणिक कार्यात केलेली मुक्तहस्ते मदत यांसारख्या गुणांमुळे ते सर्वत्र प्रसिद्ध आहेत.

शिक्षण क्षेत्रात सेवा बजावत असतानाच त्यांनी आदिशक्ती श्री रामवरदायिनी देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त, कर्तव्यदक्ष सजग नागरिक, नेहरू युवा मंडळाचे मार्गदर्शक, नवीन संकल्पनांचे प्रणेते अशा विविध क्षेत्रात अतुलनीय कामगिरी करून गावाचा नावलौकिक वाढवण्यात मोलाचे योगदान दिले.

त्यांच्या आजवरच्या शैक्षणिक, सामाजिक, राजकीय आणि सांस्कृतिक क्षेत्रातील कार्याचा गौरव म्हणून पार सोंड व शिरवली केंद्रातील सर्व शिक्षक आणि पार्वतीपूर ग्रामस्थांच्या वतीने त्यांना मानपत्र देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

ठाकरे बंधू एकत्र येणार?

Post Views: 82  ठाकरे बंधू  एकत्र येणार   राज ठाकरे यांनी दिलखुलास भाष्य केलं आहे. ते महेश मांजरेकर यांनी घेतलेल्या मुलाखतीत

Live Cricket