अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची मने सैनिकांसाठी विद्यार्थ्यांचा प्रेमाचा धागा; ५०० जवानांना राख्या अन् मिठाई मंजू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या फॅशन डिझाईनिंग व हॉटेल मॅनेजमेंट विभागाचा उपक्रम गणेशोत्सव मंडळांनी विहित परवानगीसाठी अर्ज सादर करण्याचे-सहायक धर्मादाय आयुक्तांचे आवाहन नेपाळ पूरग्रस्त भागात अडकलेल्या नागरिकांसाठी बीजिंग व काठमांडू भारतीय दूतावासाचे हेल्पलाइन क्रमांक जाहीर ऐतिहासिक प्रतापसिंह महाराज उद्यानाच्या विकासासाठी ५ कोटींचा निधी मंजूर परिक्षा केंद व परीसरात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 लागू
Home » ठळक बातम्या » राशींभविष्य » दैव बलवत्तर कारमधील प्रवाशांना साधे खरचटलेही नाही किणी टोल नाक्यावरील घटना

दैव बलवत्तर कारमधील प्रवाशांना साधे खरचटलेही नाही किणी टोल नाक्यावरील घटना 

दैव बलवत्तर कारमधील प्रवाशांना साधे खरचटलेही नाही किणी टोल नाक्यावरील घटना 

रविवारी सकाळी साडेसातची वेळ किणी टोल नाक्यावरील बुथ क्रमांक सहावर एसटीबस टोल भरण्यासाठी थांबली, पाठोपाठ कार थांबली, इतक्यात पाठीमागून नियंत्रण सुटलेला कंटेनर कारवर आदळला. त्‍यामुळे कार पुढील एसटी बसवर आदळली. यानंतर कंटेनर लेनवरच पलटी झाला..बघणाऱ्यांच्या काळजाचा ठोका चुकला. पण दैव बलवत्तर कारमधील प्रवाशांना साधे खरचटलेही नाही. 

खरोखरच काळजाचा ठोका चुकविणाऱ्या या अपघाताने दैव काय असते हे दाखवून दिले. फलटणच्या साखरवाडी येथील रोहित मदने, अनिल मोठे, सोहन भापकर हे तिघेजण मारुती अल्टो कार मधुन फलटणहुन आदमापूर येथे बाळुमामांच्या दर्शनासाठी निघाले होते. सकाळी साडेसातच्या सुमारास ते किणी टोल नाक्यावर आले. कारच्या पुढे मुंबईहून कोल्हापूरला जाणारी एसटी बस  टोल भरण्यासाठी थांबली होती. कारही पाठोपाठ येऊन थांबली. इतक्यात पुण्याकडून बंगलोरला निघालेल्या भरधाव असणाऱ्या कंटेनर  च्या चालकाचा कंटेनरवरील ताबा सुटला. डोळ्याचे पाते लवते न लवते तोपर्यंत पुढे उभ्या असणाऱ्या कारला जोराची धडक दिली आणि लेनमध्येच पलटी झाला. अर्धी कार पुढे असणाऱ्या एसटी बसच्या खाली जाऊन घुसली.

कारच्या मागील पुढील अशा दोन्ही बाजूंचा चक्काचूर झाला. टोल नाक्यावर पळापळ सुरू झाली. अंदाज घेत बचाव कार्य सुरू झाले. एसटी खाली गेलेली कार बाहेर काढण्यात आली.अन आश्चर्य म्‍हणजे कार मधील तिघांपैकी एकालाही साधे खरचटलेही नव्हते. मात्र भयभीत झालेल्या या तिघांच्या तोंडातून शब्दही फुटत नव्हते. केवळ आभाळाकडे हात जोडत आम्हाला मामांनीच वाचविल्याची भावना व्यक्त केली. दरम्यान रविवारी सुट्टीचा दिवस असल्याने नाक्यावर आधीच गर्दी होती. त्यातच हा अपघात घडल्याने वाहनांच्या लांबवर रांगा लागल्या होत्या. या अपघाताची नोंद वडगाव पोलीस ठाण्यात झाली आहे.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची मने

अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची

Live Cricket