Home » ठळक बातम्या » एक्सीडेंट » भुईंज गावच्या हद्दीत पुणे सातारा महामार्गावर कारच्या धडकेत एक ठार एक गंभीर जखमी

भुईंज गावच्या हद्दीत पुणे सातारा महामार्गावर कारच्या धडकेत एक ठार एक गंभीर जखमी

भुईज गावच्या हद्दीत पुणे सातारा महामार्गावर कारच्या धडकेत एक ठार एक गंभीर जखमी

वाई प्रतिनिधी (शुभम कोदे)भुईंज येथे सर्विस रस्त्यावर झालेल्या अपघातात एकजण ठार तर एकजण गंभीर जखमी झाला आहे. दुचाकी चालक उमेश हणमंत पवार वय ४५ असे ठार झालेल्या व्यक्तीचे नाव असून जखमी मुलगा शौर्य उमेश पवार वय १२ दोघे रा.सरताळे जावळी सध्या अमृतवाडी ता.वाई असे नाव आहे.

घटनास्थळावर मिळालेल्या माहितीनुसार आज दुपारच्या सुमारास उमेश पवार व त्यांचा मुलगा शौर्य पवार हे दोघे दुचाकी क्रं एम एच ११ ऐएन ५६०१ वरून केंंजळ ता.वाई येथील डिमार्ट येथे खरेदीसाठी गेले होते. खरेदी करून भुईंजमार्गे पुन्हा सरताळे येथे निघाले असता भुईंजनजीक देगावफाट्यावर पाठीमागून आलेल्या कारने क्रं एम एच १० डीटी ६१८९ ने जोरदार धडक दिली. या धडकेत दुचाकीस्वार उमेश हणमंत पवार यांच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन रक्तस्त्राव झाल्याने जागीच ठार झाले तर मुलगा शौर्य हा जखमी झाला आहे.जखमी शौर्य यास पुढील उपचारासाठी सातारा येथे पाठविण्यात आले आहे.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

सातारा जिल्हा बॉक्सिंग स्पर्धेत श्रीपतराव पाटील हायस्कूलला सुवर्ण झळाळी

Post Views: 51 सातारा जिल्हा बॉक्सिंग स्पर्धेत श्रीपतराव पाटील हायस्कूलला सुवर्ण झळाळी सातारा:करंजे पेठ येथील शिक्षण प्रसारक संस्था संचलित श्रीपतराव

Live Cricket