अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची मने सैनिकांसाठी विद्यार्थ्यांचा प्रेमाचा धागा; ५०० जवानांना राख्या अन् मिठाई मंजू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या फॅशन डिझाईनिंग व हॉटेल मॅनेजमेंट विभागाचा उपक्रम गणेशोत्सव मंडळांनी विहित परवानगीसाठी अर्ज सादर करण्याचे-सहायक धर्मादाय आयुक्तांचे आवाहन नेपाळ पूरग्रस्त भागात अडकलेल्या नागरिकांसाठी बीजिंग व काठमांडू भारतीय दूतावासाचे हेल्पलाइन क्रमांक जाहीर ऐतिहासिक प्रतापसिंह महाराज उद्यानाच्या विकासासाठी ५ कोटींचा निधी मंजूर परिक्षा केंद व परीसरात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 लागू
Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » उद्योगजगत » राज्यातील सातबारा उताऱ्यात झालेे 11 महत्त्वाचे बदल

राज्यातील सातबारा उताऱ्यात झालेे 11 महत्त्वाचे बदल 

राज्यातील सातबारा उताऱ्यात झालेे 11 महत्त्वाचे बदल 

महसूल विभागाने मोठे बदल करून सातबारा उताऱ्याला अधिक स्पष्ट, अचूक आणि समजण्यास सोपे बनवले असून नवीन सुधारणा केल्यामुळे आता कोणत्याही सामान्य नागरिकाला सातबारा उतारा वाचणे सोपे जाणार आहे.

गावाचा कोड क्रमांक दिसणार आधी फक्त गावाचे नाव दिसत असे, पण आता त्यासोबत गावाचा कोड क्रमांक (LGD Code) असेल. यामुळे डिजिटल रेकॉर्ड अधिक व्यवस्थित ठेवता येतील.जमिनीच्या प्रकाराची स्पष्टता पूर्वी संपूर्ण क्षेत्र एकत्र नोंदवले जात असे, पण आता लागवडीयोग्य क्षेत्र वेगळे,पोटखराब क्षेत्र वेगळे त्यांची एकूण बेरीज स्वतंत्रपणे दर्शवली जाईल

नवीन मापन पद्धती – संपूर्ण बदल पूर्वी सर्वच जमिनीसाठी एकाच प्रकारचे मापन एकक वापरले जात होते, पण आता:शेतीसाठी ➝ हेक्टर, आर, चौरस मीटर

बिनशेतीसाठी ➝ आर, चौरस मीटर

खाते क्रमांक आता सरळ दिसेल

पूर्वी खाते क्रमांक ‘इतर हक्क’ मध्ये दिसत असे. आता तो थेट खातेदाराच्या नावासमोर दिसेल, त्यामुळे कोणत्या खातेदाराकडे किती जमीन आहे, हे लगेच समजेल.

मृत खातेदारांची माहिती स्पष्ट

पूर्वी मृत व्यक्तींच्या नोंदी कंसात दिसत होत्या. आता त्यावर आडवी रेष मारली जाईल, त्यामुळे कोण जिवंत आहे आणि कोण मृत आहे हे सहज समजेल.

प्रलंबित फेरफारांची स्वतंत्र नोंद पूर्वी फेरफार प्रक्रियेत असलेल्या जमिनींसाठी स्वतंत्र रकाना नव्हता, त्यामुळे नागरिकांना गोंधळ होत असे.आता ‘प्रलंबित फेरफार’साठी स्वतंत्र रकाना असेल.जुन्या फेरफार क्रमांकांसाठी वेगळा रकाना पूर्वी सर्व फेरफार क्रमांक एका ठिकाणी मिसळून लिहिले जात, पण आता जुने आणि नवीन फेरफार क्रमांक वेगळ्या रकान्यात दिसतील.खातेदारांच्या नावांमध्ये ठळक रेषा

पूर्वी दोन वेगवेगळ्या खातेदारांची नावे एकमेकांमध्ये मिसळली जात, त्यामुळे चुकून वाचनाच्या गडबडी होऊ शकत होत्या. आता नावांमध्ये ठळक रेष असेल, त्यामुळे प्रत्येक खातेदार सहज ओळखता येईल.

गट क्रमांकासोबत शेवटचा व्यवहार दिसेल.

पूर्वी गट क्रमांक आणि शेवटच्या फेरफाराची माहिती वेगळ्या ठिकाणी शोधावी लागत असे, पण आता ती इतर हक्क रकान्यात शेवटी दिसेल.बिनशेती जमिनींसाठी नवीन नियमबिनशेती क्षेत्र ‘आर चौरस मीटर’मध्येच मोजले जाईल.‘जुडी’ आणि ‘विशेष आकारणी’ हे रकाने हटवले गेले.अकृषिक जमिनींसाठी विशेष सूचना आता सातबारा उताऱ्याच्या शेवटी स्पष्ट सूचना असेल सदरचे क्षेत्र अकृषक क्षेत्रामध्ये रुपांतरित झाले असल्याने गाव नमुना-12 लागू नाही.या बदलांमुळे नागरिकांना होणारे थेट फायदे सातबारा उतारा वाचणे सोपे आणि स्पष्ट झाले.डिजिटल प्रणालीमुळे महसूल विभागाच्या कामात पारदर्शकता आणि वेग वाढला.जमिनीशी संबंधित वाद आणि गैरसमज कमी होतील.ऑनलाइन सातबारा उतारा काढणे आणि समजणे सोपे होणार.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची मने

अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची

Live Cricket