Home » राज्य » शिक्षण » महिलांनी स्वकर्तृत्वावर यश संपादन करावे : समताताई घोरपडे

महिलांनी स्वकर्तृत्वावर यश संपादन करावे : समताताई घोरपडे

महिलांनी स्वकर्तृत्वावर यश संपादन करावे : समताताई घोरपडे

नागझरी येथे आज नारीशक्ती सन्मान पुरस्काराचे उत्साहात वितरण

सातारा -सातारा जिल्ह्यातील सावित्रीच्या लेकीनी उद्योजकता, कृषी व सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रात स्वकर्तृत्वावर यश संपादन करावे व आपली कार्यक्षमता सिद्ध करावी यासाठी स्वाभिमानी महिला मंचच्या माध्यमातून आम्ही पाठभळ उभे करू असा विश्वास स्वाभिमानी महिला मंचच्या अध्यक्षा सौ. समताताई मनोज घोरपडे यांनी व्यक्त केला. 

नागझरी ता. कोरेगाव जि.सातारा येथील कर्तृत्ववान महिलांना जागतिक महिला दिनानिमित्त नारीशक्ती सन्मान पुरस्कार 2025 देऊन सन्मानित करण्यात आले. गुजरात सिलवासा येथील टॉपसेल फाउंडेशन व नागझरी ग्रामविकास संस्थेच्या वतीने महिला बचत गटातील नवीन व्यवसायाचे उद्घाटन देखील यावेळी झाले.

 या कार्यक्रमासाठी स्वाभिमानी महिला सखी मंचच्या अध्यक्षा सौ.समताताई मनोज घोरपडे,स्वाभिमानी महिला सखी मंचच्या संचालिका सौ. तेजस्विनी संग्राम घोरपडे, पुणे येथील सहाय्यक पोलीस निरीक्षक व नागझरी गावच्या स्नुषा सौ. वैशाली अमृत भोसले यांची प्रमुख उपस्थिती होती.

 या पुरस्कार सोहळ्याच्या अध्यक्षपदी नागझरी गावच्या कर्तव्यदक्ष पोलीस पाटील सौ. रूपाली रामदास भोसले यांनी भूषविले.

 यावेळी नागझरी गावातील स्वतःच्या हिमतीवर राज्यभरात असामान्य कर्तृत्व सिद्ध केलेल्या रणरागिनींना नारीशक्ती सन्मान पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आला. सन 2025 चा नारीशक्ती सन्मान पुरस्कार बँकॉक येथे स्थायिक असलेल्या आध्यात्मिक व उद्योजकीय क्षेत्रात मोठे काम असलेल्या सौ.सुजाता दौलत भोसले, पुणे येथील उद्योजिका व स्किल्स जेनिक्स च्या संचालिका सौ.नेहा प्रदीप भोसले, सातारा येथील हजारो महिलांचे संघटन करणाऱ्या सई फाउंडेशनच्या अध्यक्षा सौ. अनिता संजय भोसले, मुळीकवस्ती नागझरी येथील शेतीमध्ये काम करून मुलांना उच्च शिक्षण देणाऱ्या श्रीमती नंदा आबा मुळीक,मुंबई येथील महाराष्ट्र कास्ट्राईब महिला संघटनेच्या अध्यक्ष सौ ज्योती मिलिंद पाटील शिरसाट यांना सन्मानित करण्यात आले.

 यावेळी नागझरी गावच्या आपल्या असामान्य कर्तृत्वातून विश्व निर्माण करणाऱ्या माजी उपसरपंच सौ. मंगल अजित भोसले, सौ. रंजना शिवाजी भोसले, सौ. भारती धनाजी भोसले, सौ. सारिका शामराव तूपसौंदर्य, सौ. माया भास्कर काळे यांना सावित्री रत्न पुरस्कार 2025 देऊन सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमासाठी नागझरी गावातील महिलांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक नागझरी ग्रामविकास संस्थेचे संचालक चंद्रकांत भोसले यांनी केले तर आभार रामदास भोसले यांनी मानले.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

बावधन ग्रामस्थांनी घेतली छत्रपती खासदार उदयनराजे भोसले यांची भेट 

Post Views: 90 बावधन ग्रामस्थांनी घेतली छत्रपती खासदार उदयनराजे भोसले यांची भेट  सातारा -महाराष्ट्रातील प्रसिद्ध आणि मानाची यात्रा म्हणजे वाई

Live Cricket