Post Views: 446
जगप्रसिद्ध बावधन बगाड यात्रेचा मानाचा बगाड्या ठरला!
सातारा : मध्यरात्री १२ वाजता भैरवनाथ महाराजांना विधिवत कौल लावून अजित बळवंत ननावरे यांना यंदाच्या मानाच्या बगाड्याचा सन्मान प्राप्त झाला आहे.अजित बळवंत ननावरे यांनी २०१४ साली भाऊ सुनील ननावरे यांच्या विवाह योगासाठी नाथांना नवस केला होता. आणि तो नवस पूर्ण झाला नवस पूर्ण झाल्याने त्यांनी भक्तिपूर्वक भैरवनाथ महाराजांच्या बगाड घेण्यासाठी पहिल्यांदाच कौल घेतला आणि यंदाच्या बगाड्याचा मान त्यांना मिळाला.
रंगपंचमी, बुधवार ,दिनांक 19 मार्च 2025 रोजी बावधन बगाड यात्रा संपन्न होत आहे. बावधन गावात उत्साहाचे आणि भक्तिमय वातावरण असून सर्वत्र काशीनाथाचे चांगभले चा जयघोष घुमत आहे.




