Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » ऑटोमोबाईल » HSRP नंबरप्लेट ‘या’ गाड्यांना लावण्याची नाही गरज?

HSRP नंबरप्लेट ‘या’ गाड्यांना लावण्याची नाही गरज?

HSRP नंबरप्लेट ‘या’ गाड्यांना लावण्याची नाही गरज?

सातारा -महाराष्ट्र परिवहन विभागाने एक मानक कार्यप्रणाली (SOP) जारी केली, या अंतर्गत सगळ्या बाईक आणि कारला HSRP नंबरप्लेट सक्तिचं करण्यात आलं आहे. यासाठी गाडी मालकांना मार्च 2025 पर्यंत मुदत देण्यात आली होती जी आता एप्रिल 2025 पर्यंत वाढवण्यात येत आहे. जर तोपर्यंत ही HSRP लावलं गेलं नाही तर नियमांनुसार दंड आकारला जाईल.

पण हा नियम लागु झाल्यानंतर सर्वसामान्यांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले. जसे की, HSRP म्हणजे नक्की काय? ते कोणत्या गाड्यांना लावण्याची गरज आहे किंवा नाही?

HSRP म्हणजे काय?

ही एक विशेष प्रकारची नंबर प्लेट आहे, जी चोरी, गैरवापर आणि बनावट नंबर प्लेट्स रोखण्यासाठी सरकारने अनिवार्य केली आहे. या प्लेटमध्ये एक खास क्रोमियम-आधारित होलोग्राम, लेसर-कोड आणि स्थायिक क्रमांक असतो, जो डुप्लिकेट नंबर प्लेट तयार होण्यापासून वाचवतो.

HSRP कोणत्या गाड्यांसाठी आवश्यक आहे?

▪️सरकारच्या नियमानुसार, ज्या गाड्या 1 एप्रिल 2019 पूर्वी नोंदणीकृत झाल्या आहेत, त्यांना HSRP नंबर प्लेट लावणे अनिवार्य आहे.

 दोन चाकी (बाईक, स्कूटर)

चार चाकी (कार, एसयूव्ही, जीप)

कमर्शियल वाहन (ट्रक, बस, )जर तुमच्या गाडीची नोंदणी 1 एप्रिल 2019 नंतरची असेल, तर तुमच्या गाडीत आधीच HSRP असेल, त्यामुळे तुम्हाला नवीन नंबर प्लेट घेण्याची गरज नाही.ही प्लेट मिळवण्यासाठी ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही पद्धत आहे.

HSRP नंबर प्लेटसाठी खर्च किती

 दोन चाकी वाहन: ₹300 ते ₹500

चार चाकी वाहन: ₹600 ते ₹1,200

कमर्शियल वाहन: ₹1,500 ते ₹2,000

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

बावधन ग्रामस्थांनी घेतली छत्रपती खासदार उदयनराजे भोसले यांची भेट 

Post Views: 92 बावधन ग्रामस्थांनी घेतली छत्रपती खासदार उदयनराजे भोसले यांची भेट  सातारा -महाराष्ट्रातील प्रसिद्ध आणि मानाची यात्रा म्हणजे वाई

Live Cricket