यशोदा शिक्षण संस्था आणि लायन्स क्लब यांच्या वतीने महिला दिनानिमित्त मोफत आरोग्य तपासणी शिबीर संपन्न
समाजाच्या जडणघडणीमध्ये महिलांचे योगदान अत्यंत मोलाचे: प्रा.दशरथ सगरे
यशोदा शिक्षण संस्थेच्या, साधना प्राथमिक शाळेत लायन्स क्लब सातारा यांच्या वतीने खास महिला पालक आणि शिक्षिका यांच्यासाठी मोफत नेत्र तपासणी आणि ब्रेस्ट कॅन्सर तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून यशोदा शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रा .दशरथ सगरे होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी सातारा लायन्स क्लब उपाध्यक्ष श्री.कुलदीप मोहिते .श्री.राजेंद्र कुमार मोहिते, श्री शाहू धर्मादाय नेत्र रुग्णालय आणि वृषाली मुखेडकर यावेळी उपस्थित होते.
आंतरराष्ट्रीय महिला दिन मोठे उत्साहात साजरा केला जातो, ज्यात महिलांच्या साध्यांवर प्रकाश टाकला जातो आणि समानता व महिलांच्या हक्कांसाठी जागरूकता वाढवली जाते. यावर्षीच्या थीममध्ये महिलांना शारीरिक आणि मानसिक दृष्टिकोनातून आरोग्यदायी जीवन जगण्याचा संदेश दिला जात आहे.
आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने महिलांच्या डोळ्यांच्या आरोग्याबद्दल जनजागृती करण्यासाठी डोळ्यांची तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले. या शिबीराचा उद्देश महिलांमध्ये डोळ्यांशी संबंधित विविध आजारांसंदर्भात जागरूकता वाढविणे आणि डोळ्यांचे तसेच एकंदरीत आरोग्य कसे राखावे याबद्दल माहिती देणे होता.शिबिरात उपस्थित झालेल्या महिलांना डोळ्यांची तपासणी करण्यात आली, ज्यात सामान्य डोळ्यांचे आजार आणि दृष्टीविषयक समस्यांचे परीक्षण करण्यात आले.नियमित डोळ्यांची तपासणी, डोळ्यांच्या आरोग्यासाठी चांगल्या सवयी, तसेच डोळ्यांच्या आरोग्यासाठी योग्य आहाराचा महत्त्व यावर एक माहितीपूर्ण सत्र घेतले.उपस्थित महिलांना डोळ्यांचे आरोग्य सुधारण्यासाठी आवश्यक सल्ला देण्यात आला आणि दृष्टीसाठी चष्मे किंवा इतर उपचारासाठी शिफारस करण्यात आली. यावेळी मार्गदर्शन करताना डोळ्यांचे आरोग्य आणि ब्रेस्ट कॅन्सर चे धोके यावर मार्गदर्शन करण्यात आले.
प्राध्यापक दशरथ सगळे यावेळी म्हणाले की महिलांच्या आयुष्यामध्ये आरोग्याचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. आज महिला समाजामध्ये विविध स्तरावर ती कार्यरत असताना पाहायला मिळते, पुरुषांच्या बरोबरीने किंबहुना पुरुषांच्या पेक्षा जास्त जबाबदारींचे ओझर हे महिलांच्या अंगावरती असतात. त्यामुळे केवळ महिला दिनाच्या निमित्ताने नव्हे तर रोजच महिलांच्या आरोग्याच्या बाबतीमध्ये काळजी घेणेदेखील अत्यंत महत्त्वाचे आहे. समाजातील कित्येक नामवंत महिला या आज देशाच्या जडणघडणीमध्ये योगदान देताना पाहिले की भारतासारख्या सांस्कृतिक देशाची खऱ्या अर्थाने प्रगती झाल्याचे समाधान वाटते.
यावेळी प्राचार्य सौ.वनिता जाधव आणि मुख्याध्यापिका सौ.ढवळीकर व सर्व शिक्षिका उपस्थित होत्या…
