Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » जावली तालुक्यातील नवउद्योजकांना प्रोत्साहन व युवकांना प्रेरणा मिळावी म्हणून आजोबांच्या नावाने “यशस्वी उद्योजक पुरस्कार ” सुरू केला-सोमनाथ काशिळकर.

जावली तालुक्यातील नवउद्योजकांना प्रोत्साहन व युवकांना प्रेरणा मिळावी म्हणून आजोबांच्या नावाने “यशस्वी उद्योजक पुरस्कार ” सुरू केला-सोमनाथ काशिळकर. 

जावली तालुक्यातील नवउद्योजकांना प्रोत्साहन व युवकांना प्रेरणा मिळावी म्हणून आजोबांच्या नावाने “यशस्वी उद्योजक पुरस्कार ” सुरू केला आहे. ” सोमनाथ काशिळकर. 

केळघर प्रतिनिधी:- मेढा येथील महात्मा गांधीं सार्वजनिक वाचनालया मध्ये नुकत्याच संपन्न झालेल्या विविध पुरस्कार प्रदान सोहळ्यात एलआयसी चे विकास आधिकारी सोमनाथ काशिळकर बोलत होते.मराठी माणूस व्यवसायात मागे असतो, असे नेहमी आपण ऐकत आलो आहोत, सध्या ती परिस्थिती बदलत चालली आहे, पण अजून खुप मोठी मजल मारावी लागणार आहे. यासारख्या पुरस्कारांनी याला चालना मिळेल, असे विचार मान्यवरांनी व्यक्त केले. 

मेढा येथील काशिळकर परिवाराच्या कै.लक्ष्मण सखारामशेठ काशिळकर ( दादाशेठ) यांच्या स्मरणार्थ सूरू केलेला यशस्वी उद्योजक हा पुरस्कार कौस्तुभ पेट्रोलियम व कौस्तुभ स्पेअर पार्टचे संचालक श्री नामदेव वांगडे ( बापू ) यांना श्री मुरलीधर लक्ष्मण काशिळकर यांच्या हस्ते देण्यात आला. या प्रसंगी बालाजी ट्रस्ट सातारचे अध्यक्ष श्री राजेंद्र चोरगे,माजी पोलीस सह आयुक्त श्री राजेंद्र मोकाशी,माजी उपसभापती कांतीभाई देशमुख,प्राध्यापक श्रीधर सांळुखे,प्राध्यापक तुकाराम ओंबळे,माजी सरपंच बबनदादा वारागडे,माजी सरपंच नारायण शिंगटे गुरूजी,सुर्यकांत देशमुख,सुनील काशिळकर, संजय काशिळकर,सोमनाथ काशिळकर,महात्मा गांधीं सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष सुरेश पार्टे, सचिव धनंजय पवार, संचालक प्रकाश परांजपे,विठ्ठल देशपांडे,संचालिका श्रीमती नंदा काशिळकर,लीलाताई शेडगे,सौ.आदिती काशिळकर तसेच इतर मान्यवर उपस्थित होते. 

 कै. लक्ष्मण काशिळकर हे जुन्या पिढीतील नामांकित असे किराणा व्यावसायिक होते. दादाशेठ, दादाराया या टोपणनावाने ते पंचक्रोशीत परिचित होते.दादाशेठ यांनी कपड्याचे दुकान व वनौषधींचाही व्यवसाय सुरू केला होता.दादाशेठ यांना धार्मिक कार्याची आवड असल्याने ते मेढा येथील काकड आरती व माघी गणेश जयंती साठी सढळ हाताने मदत करत होते.घरी आम्ही सगळे त्यांना मामा म्हणत असू. त्यांच्या नावाचा पहिला पुरस्कार पिंपरी ता. जावली गावचे रहिवासी व जावली तालुक्यातील एक यशस्वी व्यावसायिक कौस्तुभ पेट्रोलियमचे संचालक नामदेव खाशाबा वागंडे यांना प्रदान करण्यात आला. याप्रसंगी वागंडे यांच्या मातोश्री, वडील बंधू व नामदेव वागंडे यांचा परिवार उपस्थित होता. वागंडे परिवाराने अतिशय खडतर परिस्थिती मधून विविध व्यवसायांच्या माध्यमातून मुंबई, सातारा व बिभवी येथे आपला जम बसवला आहे व एक यशस्वी व्यावसायिक परिवार म्हणून नावलौकिक कमावला आहे.म्हणून त्यांचा सन्मान काशीळकर कुटूंबियांच्या वतीने करण्यात आल्याचे सोमनाथ काशीळकर यांनी यावेळी सांगितले.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

बावधन ग्रामस्थांनी घेतली छत्रपती खासदार उदयनराजे भोसले यांची भेट 

Post Views: 92 बावधन ग्रामस्थांनी घेतली छत्रपती खासदार उदयनराजे भोसले यांची भेट  सातारा -महाराष्ट्रातील प्रसिद्ध आणि मानाची यात्रा म्हणजे वाई

Live Cricket