Home » ठळक बातम्या » आरोग्य » सातारा हॉस्पिटल अँड डायग्नोस्टिक सेंटर येथे विविध उपक्रमांनी महिला दिन साजरा

सातारा हॉस्पिटल अँड डायग्नोस्टिक सेंटर येथे विविध उपक्रमांनी महिला दिन साजरा

महाराष्ट्र शासन -कामगार विभाग महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ, कामगार कल्याण केंद्र सातारा व सातारा हॉस्पिटल अँड डायग्नोस्टिक सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने 8 मार्च 2025 रोजी सकाळी 11 वाजता सातारा डायग्नोस्टिक सेंटर सातारा येथे जागतिक महिला दिनानिमित्त आरोग्य शिबिर व उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

 कार्यक्रमास प्रमुख पाहुणे डॉक्टर जयश्री शिंदे डायरेक्टर, डायलीसिस तज्ञ,सातारा हॉस्पिटल सातारा तसेच प्रमुख उपस्थितीमध्ये माधवबाग क्लिनिक हेड डॉक्टर देवकी पळणीटकर माधवबाग सातारा, प्राध्यापिका शालिनी जगताप, डॉक्टर चंद्रकांत नलावडे, श्री. श्रीकांत देशमुख मॅनेजर पब्लिक रिलेशन सातारा हॉस्पिटल सातारा यांच्या प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी हॉस्पिटल स्टाफ, कर्मचारी, राजमाता नर्सिंग स्टुडन्ट, छाबडा कॉलेज यांचे इंटर्न डॉक्टर यांचे महिला दिना निमित्त सत्कार कार्यक्रम संपन्न झाला कार्यक्रमास उस्फुर्त प्रतिसाद महिलांचा मिळाला एकूण 105 महिलांनी आरोग्य शिबिराचा लाभ घेण्यात आला त्यामध्ये ,शुगर बी एस एल, बीपी रक्तदाब व जनरल चेकअप, गरजेनुसार ई सी जी तपासणी करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री संदीप कांबळे केंद्रप्रमुख कामगार कल्याण केंद्र सातारा यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार श्रीकांत देशमुख मॅनेजर पब्लिक रिलेशन यांनी केले. कार्यक्रम यशस्वी होण्याकरता श्री. सोमनाथ चोरगे, सौ.सुजाता जाधव, सौ. तृप्ती निकम, सौ. ज्योती मोरे यांनी परिश्रम घेतले.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

बावधन ग्रामपंचायत सरपंच पदी सौ वंदना जगदीश कांबळे यांची निवड

Post Views: 98 बावधन ग्रामपंचायत सरपंच पदी सौ वंदना जगदीश कांबळे यांची निवड वाई प्रतिनिधी (शुभम कोदे)आज झालेल्या बावधन ग्रामपंचायतीच्या

Live Cricket