Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » उद्योगजगत » मेढा येथील महात्मा गांधी वाचनालयाच्या वतीने विविध पुरस्कारांचे 9 रोजी वितरण

मेढा येथील महात्मा गांधी वाचनालयाच्या वतीने विविध पुरस्कारांचे 9 रोजी वितरण

महात्मा गांधी वाचनाचे विविध पुरस्काराचे ९रोजी वितरण

मानाचा “जीवनगौरव पुरस्कार “पांडुरंग देशमुख तर    जलनायक स्व.विजयराव मोकाशी “जलरत्न पुरस्कार ” नारायण सुर्वे यांना जाहीर 

 केळघर प्रतिनिधी: जावली तालुक्यामध्ये ग्रंथालय चळवळीमध्ये अग्रेसर असणाऱ्या महात्मा गांधी सार्वजनिक वाचनालय मेढा (तालुका अ वर्ग )या संस्थेच्या वतीने समाजामध्ये विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्तींचा पुरस्कार देऊन त्यांच्या कार्याचा सन्मान करण्यात येतो.यावर्षी संस्थेच्या वतीने विविध पुरस्कार वितरण समारंभाचे आयोजन बालाजी चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक / अध्यक्ष -राजेंद्र चोरगे व मुंबईचे माजी सहाय्यक पोलीस आयुक्त -राजेंद्र मोकाशी यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये संस्थेच्या सौ .विजयाताई थत्ते सभागृहामध्ये रविवार दि. 9 मार्च 2025 रोजी दु.१ वा. करण्यात आले असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष सुरेश पार्टे, सचिव धनंजय पवार यांनी दिली .

      सन 2025 सालासाठी संस्थेचे विविध पुरस्कार जाहीर झाले असून चालू वर्षीचा मानाचा “जीवन गौरव पुरस्कार “पांडुरंग महादेव देशमुख (गुरुजी) तसेच जलनायक स्व. विजयराव मोकाशी “जलरत्न पुरस्कार “नारायण सुर्वे (शेठ )यांना जाहीर करण्यात आला आहे. त्याचबरोबर कै.शामराव शिरसागर ( माजी अध्यक्ष ) जिल्हास्तरीय “आदर्श ग्रंथालय कार्यकर्ता पुरस्कार ” लक्ष्मण घाडगे -श्री खंडू आई देवी मोफत वाचनालय म्हावशी ,जि.सातारा ,स्व. मंदाकिनी ओंबळे -“जिल्हास्तरीय आदर्श शिक्षिका पुरस्कार “-. नीलिमा आडके -जि .प .शाळा बेलोशी यांना ,त्याचबरोबर स्व. महादेव जंगम ( मा. ग्रंथपाल) ” जिल्हास्तरीय आदर्श ग्रंथपाल पुरस्कार ” -बाबासाहेब गाडे -पद्मश्री ग .गो .जाधव सार्वजनिक वाचनालय यशवंत नगर वाई यांना तर स्व. मंदाकिनी ओंबळे ” जिल्हास्तरीय आदर्श सामाजिक कार्यकर्ता पुरस्कार ” -शाहीर नारायण कदम धोंडेवाडी ता. खटाव ,स्व.इंदुमती मोकाशी यांचे स्मरणार्थ ” तालुकास्तरीय आदर्श माता पुरस्कार ” श्रीमती सुंदराबाई कारंडे वरोशी ता. जावली,कै.लक्ष्मण काशीलकर (दादाशेठ ) यांच्या स्मरणार्थ ” यशस्वी उद्योजक पुरस्कार “नामदेव वांगडे -कौस्तुभ पेट्रोलियम यांना तर स्व.जनाबाई पार्टे यांचे स्मरणार्थ ” आदर्श माता पुरस्कार “सौ . रंजना करंजेकर वश्रीमती सुनिता गोरे यांना ,स्वर्गीय सावित्री थत्ते ” आदर्श महिला वाचक पुरस्कार ” सौ .अनिता जाधव ,श्रीमती नीता झेंडे ,सौ . मयुरी चव्हाण यांना जाहीर झाला आहे .या सर्व पुरस्कार प्राप्त व्यक्तींचा त्याचबरोबर जावेद मुबारक शेख व सौ जयश्री माजगावकर यांचा विशेष सन्मान या कार्यक्रमांमध्ये करण्यात येणार आहे. 

      महिला दिनाचे औचित्य साधून सदर पुरस्कार वितरण समारंभाचे आयोजन संस्थेच्या सभागृहामध्ये करण्यात आले आहे. सदरच्या कार्यक्रमासाठी पुरस्कार दाते ,पुरस्कार प्राप्त व्यक्ती , त्यांचे नातेवाईक संस्थेची हितचिंतक ,सभासद, सल्लागार , ग्रामस्थ यांनी बहुसंख्येने उपस्थित राहावे असे आवाहन सांस्कृतिक कमिटीच्या अध्यक्षा सौ. शोभा शेडगे ,कार्याध्यक्ष नारायण शिंगटे ,सहसचिव प्रकाश परांजपे, ग्रंथपाल सौ.आशा मगरे व सर्व संचालकांनी केले आहे.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

बावधन ग्रामपंचायत सरपंच पदी सौ वंदना जगदीश कांबळे यांची निवड

Post Views: 67 बावधन ग्रामपंचायत सरपंच पदी सौ वंदना जगदीश कांबळे यांची निवड वाई प्रतिनिधी (शुभम कोदे)आज झालेल्या बावधन ग्रामपंचायतीच्या

Live Cricket