महाराष्ट्र पोलिसांच्या विविध उपक्रमांचे कौतुक
फिक्की स्मार्ट पोलिसिंग पुरस्कार 2024’ने पोलिसांच्या उपक्रमांचा सन्मान!
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात महाराष्ट्र पोलिसांच्या महिला व बाल सुरक्षा सुनिश्चित करण्याच्या कामांचा तसेच सुरक्षा व्यवस्थांच्या आधुनिकीकरणामुळे पोलिसिंगचा नवा अध्याय सुरू झाल्याचे द्योतक म्हणजे महाराष्ट्र पोलिसांच्या विविध उपक्रमांचा केलेला हा गौरव. फिक्की फेडरेशन हाऊस, नवी दिल्ली येथे ‘फिक्की स्मार्ट पोलिसिंग पुरस्कार 2024’ प्रदान करण्यात आले.
यावेळी महिला, बाल सुरक्षा आणि संबंधित गुन्ह्यांच्या तपासात उल्लेखनीय काम करणार्या प्रमिला निकम, हेड कॉन्स्टेबल राजगड पोलीस स्टेशन, पुणे यांना मानवी तस्करी श्रेणीमध्ये गौरवण्यात आले. तसेच पोलीस कर्मचारी, अधिकाऱ्यांच्या समस्या, अडचणी कालमर्यादेत आणि विनात्रासाने सोडविण्यासाठी वर्ध्याचे तत्कालीन एसपी नुरुल हसन यांनी सुरू केलेल्या ई-दरबार या उपक्रमाला इतर पोलिसिंग उपक्रम श्रेणीमध्ये सन्मानित करण्यात आले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रमिला निकम, हेड कॉन्स्टेबल, राजगड पोलीस स्टेशन तसेच नुरुल हसन, पोलीस अधीक्षक, भंडारा यांचे अभिनंदन केले!
