गौरीशंकर इन्स्टिट्यूट मध्ये माजी विद्यार्थ्यांचा उचित सत्कार
माजी विद्यार्थी स्नेह मेळावा उत्साहात संपन्न , जुन्या आठवणींना उजाळा
लिंब – गौरीशंकर इन्स्टिट्यूट ऑफ फार्मास्युटिकल एज्युकेशन अँड रिसर्च लिंब महाविद्यालयातील बी. फार्मसी ,एम फार्मसी, पी.एच.डी शिक्षण पूर्ण केलेल्या माजी विद्यार्थ्यांचा तृतीय स्नेह मेळावा मोठया उत्साहात महाविद्यालयात संपन्न झाला यावेळी शैक्षणिक कार्यकाळातील जुन्या आठवणींना माजी विद्यार्थ्यांनी उजाळा देताना येथील प्राध्यापकांनी दिलेले ज्ञान व संस्कार जीवनाच्या प्रत्येक वळणावर उपयुक्त ठरत असल्याची भावना विद्यार्थ्यांनी बोलून दाखविली प्रारंभी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करून गौरीशंकर इन्स्टिट्यूट ऑफ फार्मास्युटिकल एज्युकेशन अँड रिसर्च लिंब महाविद्यालयाचा नावलौकिक उंचविणाऱ्या रूपाली बाबर, कोमल बाबर, ज्ञानेश्वर सरगर ,जागृती सुतार,वरद क्षीरसागर ,स्वप्नाली झोरे ,शुभम चव्हाण ,मोनिका कुंभार यांचा बुके स्मृतीचिन्ह देऊन संस्थेचे जनसंपर्क अधिकारी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी प्राचार्य डॉ. योगेश गुरव, डॉ.संतोष बेल्हेकर ,डॉ, धैर्यशील घाडगे ,डॉ. भूषण पवार, डॉ.स्फूर्ती साखरे, प्रा. शुभम चव्हाण प्रा. माधुरी मोहिते, प्रा. रोहन खुटाळे,माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष प्रा. दुधेश्वर क्षीरसागर, प्रबंधक निलेश पाटील अदि प्रमुख उपस्थित होते.यावेळी संस्थेचे जनसंपर्क अधिकारी श्रीरंग काटेकर म्हणाले की माजी विद्यार्थी आज विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत आहेत याचा आम्हाला सार्थ अभिमान वाटतो. प्राचार्य डॉ. योगेश गुरव म्हणाले की माजी विद्यार्थ्यांनी आजपर्यंत महाविद्यालयाच्या सर्वांगीण प्रगतीत मोलाचे योगदान राहिले आहे त्यांची अखंड साथ या पुढील काळात ही आम्हाला लाभेल याची खात्री वाटते .
यावेळी बोलताना माजी विद्यार्थिनी रूपाली बाबर म्हणाली की महाविद्यालय स्तरावर येथील प्राध्यापकांनी आमचे करिअर घडविण्यासाठी घेतलेले परिश्रम आमच्या उज्वल भविष्य साठी उपयुक्त ठरले आहे.यावेळी अनेक माजी विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. गौरी इथापे यांनी केले व आभार प्रा. शुभम चव्हाण यांनी मानले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आजी-माजी विद्यार्थी तसेच शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.
