Home » देश » धार्मिक » गोडोली येथील सावित्रीबाई फुले महिला उद्यानाची दैनाअवस्था.. वृक्ष कोमजले, खेळणी गंजली, प्रशासनाचे दुर्लक्ष

गोडोली येथील सावित्रीबाई फुले महिला उद्यानाची दैनाअवस्था.. वृक्ष कोमजले, खेळणी गंजली, प्रशासनाचे दुर्लक्ष

गोडोली येथील सावित्रीबाई फुले महिला उद्यानाची दैनाअवस्था.. वृक्ष कोमजले, खेळणी गंजली, प्रशासनाचे दुर्लक्ष

सातारा – सुंदर सातारा हरित सातारचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून सातारा नगरपालिका प्रशासनाने शहराच्या विविध भागात उपक्रम राबविला विशेषता ज्या ज्या ठिकाणी मोकळ्या जागा आहेत त्या ठिकाणी ओझोन वायूचे मोठ्या प्रमाणात निर्मिती व्हावी या दृष्टीने उद्यानाची ठिकठिकाणी उभारणी केली मनसोक्त स्वच्छ हवा विरंगुळाचा क्षण नागरिकांना विशेषता महिला वर्गाला अनुभवता यावा यासाठी गोडोली येथे सावित्रीबाई फुले महिला उद्यानाची निर्मिती नगरपालिका प्रशासनाने केली या उद्यानात विविध प्रकारचे रंगीबेरंगी फुलझाडे लहान मुलांसाठी विविध प्रकारची खेळण्याचे साहित्याची सोय करण्यात आली परंतु गेल्या अनेक दिवसांपासून हे उद्यान बंद अवस्थेत असल्याने परिसरातील जेष्ठ नागरिक व महिलांची गैरसोय झाली आहे या उद्यानातील कोमजून गेलेले वृक्ष व मोडकळीस आलेली खेळणी पाहून नागरिकांच्या मनाला तीव्र वेदना होत आहेत वास्तविक लाखो रुपये खर्च करून उभारण्यात आलेल्या उद्यानाकडे नगरपालिका प्रशासनाने जागरूकपणे लक्ष देणे गरजेचे होते प्रशासनाच्या डोळेझाक भूमिकेमुळे या परिसरातील या उद्यानाची दयनीय स्थिती झाली आहे या उद्यानाच्या निर्मितीमुळे येथील असंख्य महिला व लहान मुलांना याचा लाभ झाला होता मनावरील ताण कमी होण्यासाठी व दिवसभरातील केलेले श्रमा मुळे थकलेल्या शरीराला आरामदायी वाटण्याची एक केंद्र म्हणून या उद्यानाचा उपयोग महिला वर्गाला होत होता परंतु उद्यानालाच कुलूप लागल्याने लाखो रुपये तर पाण्यात गेलेच पण महिला वर्गाची एक हक्काचे विरंगुळाच्या केंद्राला त्या मुकल्याचे बोलले जात आहे .

उद्यानात सर्वत्र पालापाचोळ्याचा खच पडला आहे पाण्याविना वृक्ष कोमजून गेले आहेत बंद उद्यानामुळे खेळणी नादुरुस्त झाली आहेत सर्वत्र कचरा व अस्वच्छता झाली आहे लाईट व्यवस्था बंद पडलेली आहे लाखो रुपये खर्च करून उभारण्यात आलेले उद्यान निगेअभावी दैनाअवस्था झाली आहे.

नागरिकांच्या कररुपातून जमा होणारा लाखो रुपयांचा विनियोग योग्य पद्धतीने नगरपालिका प्रशासनाने करणे गरजेचे आहे उद्यान निर्मितीमुळे ज्येष्ठ नागरिक महिला वर्ग यांना एक हक्काचे व्यासपीठ उपलब्ध झाले होते लहान मुलांना खेळण्यासाठी सुरक्षित जागा उपलब्ध होती गोडोली परिसरातील नागरिकांसाठी उभारण्यात आलेले उद्यान बंद अवस्थेत पाहून वेदना होतात संबंधित यंत्रणेने त्वरित दखल घेणे अपेक्षित आहे.

                                      श्रीरंग काटेकर सातारा 

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

बावधन ग्रामस्थांनी घेतली छत्रपती खासदार उदयनराजे भोसले यांची भेट 

Post Views: 64 बावधन ग्रामस्थांनी घेतली छत्रपती खासदार उदयनराजे भोसले यांची भेट  सातारा -महाराष्ट्रातील प्रसिद्ध आणि मानाची यात्रा म्हणजे वाई

Live Cricket