Home » राज्य » शिक्षण » दिशा ॲकॅडमीच्या विद्यार्थ्यांचा जेईई-मेन परीक्षेत घवघवीत यश

दिशा ॲकॅडमीच्या विद्यार्थ्यांचा जेईई-मेन परीक्षेत घवघवीत यश

दिशा ॲकॅडमीच्या विद्यार्थ्यांचा जेईई-मेन परीक्षेत घवघवीत यश

वाई प्रतिनिधी -जेईई-मेन 2025 (Session-I) चा निकाल जाहीर झाला असून दिशा ॲकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय कामगिरी करत चमकदार निकालाची परंपरा कायम राखली आहे. दिशाच्या टॉप स्कोअरर्समध्ये आर्य गारगे (99.20%ile), शंतनू मोरे (99.11%ile), शुभम माळी(98.90%ile), मयंक चंदोळे(98.68%ile), अनुराग कुमार (98.43%ile) यांनी स्थान पटकावले आहे.

हे यश विद्यार्थ्यांच्या मेहनत आणि परिश्रमासोबतच, दिशा ॲकॅडमीच्या उत्कृष्ट मार्गदर्शन पद्धतीचे फलित आहे; असे सांगत दिशा ॲकॅडमीच्या व्यवस्थापकीय संचालिका प्रा. रूपाली कदम यांनी इंजिनिअरिंग क्षेत्रातील भविष्यातील वाटचालीसाठी विद्यार्थ्यांना भरभरून शुभेच्छा दिल्या आहेत. 

दिशाच्या ॲकॅडमीच्या शैक्षणिक योगदानाबाबत बोलताना प्रा. रूपाली कदम म्हणाल्या; शिकणे अधिकाधिक समृद्ध व्हावे यासाठी दिशा सातत्याने प्रगतीशील आहे. १००टक्क्यांपर्यंत स्कॉलरशीप मिळविण्याची संधी देणारी व शिक्षणाचा आर्थिक भार कमी करण्यासाठी दिशा ॲकॅडमीची DSAT (Disha Scholarship cum Admission Test) स्कॉलरशीप महाराष्ट्रभरातील पालक आणि विद्यार्थ्यांसाठी फायदेशी ठरत आहे. १०वी बोर्डाची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना आपली स्वप्न पूर्ण करता यावीत यासाठी दिशा ॲकॅडमीची DSAT (Disha Scholarship cum Admission Test) स्कॉलरशीप परीक्षा २० ते ३१ मार्च या कालावधीत ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येणार आहे. २२ व २३ मार्च या दोन दिवसात ऑफलाईन पद्धतीने इच्छुक विद्यार्थी या परीक्षेला बसू शकतात. दिशा ॲकॅडमी वाई, बारामती, पुणे, सातारा या शाखेतून ऑफलाईन परीक्षा देण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. जे विद्यार्थी ऑनलाईन परीक्षेद्वारे स्कॉलरशीप मिळविण्यास इच्छुक आहेत त्यांनी अधिक माहितीसाठी 7775925923 या क्रमांकावर संपर्क साधून अधिक माहिती घ्यावी असे आवाहन दिशा ॲकॅडमीतर्फे करण्यात येत आहे. 

दिशा ॲकॅडमीचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. नितीन कदम यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करताना सांगितले की, “आमचे विद्यार्थी हे आमच्या यशाचे खरे मानदंड आहेत. त्यांची मेहनत, सातत्य आणि गुणवत्ता हेच त्यांच्या यशामागील मुख्य घटक आहेत. आमच्या संपूर्ण टीमला याचा अभिमान आहे.” दिशा ॲकॅडमीच्या डी-सॅट (DSAT) स्कॉलरशिप परीक्षेच्या वैशिष्ठ्यांबाबत माहिती देतांना नितीन कदम म्हणाले; “१०वीच्या अभ्यासक्रमावर आधारीत असून बौद्धिक कौशल्याच्या जोरावर विद्यार्थी भरधोस स्कॉलरशीप मिळवू शकतात. यामुळे पालकवर्गाचा शैक्षणिक खर्चाचा आर्थिक भार कमी होणार आहे. शिवाय गुणवंत विद्यार्थी JEE परीक्षेची संपूर्ण तयारी करण्यासाठी योग्य मार्गदर्शन आणि सुविधा मिळण्यास सक्षम होणार आहेत. या परीक्षेतून SUPER-30 क्लासरूम कोर्स ही अभिनव संकल्पना दिशा राबवित असून 31 मार्च 2025 पासून नवीन बॅच सुरू होत आहे.” अधिकाधिक विद्यार्थ्यांनी दिशाच्या स्कॉलरशीपचा भरपूर फयदा करून घ्यावा असेही नितीन कदम म्हणाले.   

जेईई-मेन 2025 (Session-I) मध्ये चमकदार यश मिळविलेल्या विद्यार्थ्यांच्या सत्कार दिशा ॲकॅडमीने केला आहे. यशस्वी विद्यार्थ्यांना भविष्यातील वाटचालीसाठी शुभेच्छा देत, देशातील सर्वोत्तम इंजिनिअरिंग संस्थांमध्ये प्रवेश मिळवून उज्ज्वल कारकीर्द घडवावी, अशी सदिच्छा दिशा ॲकॅडमीतील सर्व शिक्षक, कर्मचारी व पालक वर्गाने व्यक्त केली आहे.

दिशा ॲकॅडमी सातत्याने गुणवत्तापूर्ण मार्गदर्शन, अत्याधुनिक शिक्षण पद्धती आणि विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी समर्पित आहे. दिशा ॲकॅडमीत विद्यार्थी केवळ अभ्यासच नाही तर करिअरकडे लक्ष केंद्रित करून शिकतात. समविचारी, मेहनती आणि करिअर-केंद्रित विद्यार्थी एकत्र येतात हे प्रभावी पिअर लर्निंग एन्व्हायर्नमेंट विद्यार्थ्यांच्या आत्मविश्वासात वाढ करते आणि त्यांना सर्वोत्तम निकाल मिळवण्यासाठी प्रोत्साहित करते. अनुभवी तज्ज्ञ शिक्षकांचे मार्गदर्शन, समृद्ध रेफरन्स मटेरियलसह अत्याधुनिक लायब्ररी, शंका निरसनासाठी डाऊट क्लिअरिंग सेशन्स, नियमित टेस्ट आणि परफॉर्मन्स ॲनालिसिस, होस्टेल आणि मेसची उत्तम सुविधा; हे सर्व घटक दिशातील शिक्षणाला अधिक प्रभावी आणि परिणामकारक बनवतात. पुढील वर्षी अधिकाधिक विद्यार्थ्यांना सर्वोत्तम निकाल मिळावा यासाठी दिशा ॲकॅडमीचा प्रयत्न अविरत सुरू राहाणार आहे.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

बावधन ग्रामस्थांनी घेतली छत्रपती खासदार उदयनराजे भोसले यांची भेट 

Post Views: 90 बावधन ग्रामस्थांनी घेतली छत्रपती खासदार उदयनराजे भोसले यांची भेट  सातारा -महाराष्ट्रातील प्रसिद्ध आणि मानाची यात्रा म्हणजे वाई

Live Cricket